Home > News Update > Baramati Loksabha : सुप्रिया सुळे Vs सुनेत्रा पवार ? सुप्रिया सुळे म्हणाल्या...

Baramati Loksabha : सुप्रिया सुळे Vs सुनेत्रा पवार ? सुप्रिया सुळे म्हणाल्या...

Baramati Loksabha : सुप्रिया सुळे Vs सुनेत्रा पवार ? सुप्रिया सुळे म्हणाल्या...
X

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसह अजित पवार हे महायुती सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतच अजून लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांचं जागावाटप ठरलेलं नाहीये. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झालीय. त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरूद्ध भावजय अशी रंगतदार लढत होण्याची शक्यता वर्तविली जातेय. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती इथल्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलीय.

बारामतीतून सुनेत्रा पवार लढणार असल्याच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण लोकशाही मानतो. त्यामुळे कुणी ना कुणी माझ्याविरोधात लढणारच आहे. त्यामुळे अशा निर्णयाचं पूर्ण ताकदीने स्वागत केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

बारामती हा पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला आहे. लोकसभा असो की विधानसभा या दोन्ही मतदारसंघातून पवार कुटुंबियातील उमेदवारच निवडून आलेला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर आता राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झालीय. त्याबाबत सुप्रिया सुळे यांना माध्यमांनी विचारणा केली. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,” आमच्याकडे तरी लोकशाही आहे. दिल्लीत काय दडपशाही सुरू असते, हे संपूर्ण देश पाहतोय. मात्र, आमच्याकडे लोकशाहीच आहे. त्यामुळं मला वाटतं की, कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. आपण या सगळ्या गोष्टींचा मान-सन्मान ठेवला पाहिजे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यावेळी सुप्रिया सुळेंनी भाजपचाही उल्लेख केला. त्या म्हणाल्या, “ भाजपनं तीन वेळा बारामतीमधून माझ्या विरोधात निवडणूक लढविली. यावेळीही कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. मी लोकशाहीचं मनापासून स्वागत करते. ही लोकशाही जगली पाहिजे, टिकली पाहिजे. आपण अशा सर्व निर्णयांचं पूर्ण ताकदीनं स्वागत केलं पाहिजे. कुणीतरी विरोधात लढलंच पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान, याप्रकरणी सुनेत्रा पवार यांच्याकडून अद्यापही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Updated : 25 Sept 2023 9:14 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top