छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावून बार चं उद्घाटन ठाकरे सरकारचे मंत्री भुमरे वादाच्या भोवऱ्यात
X
गावा-गावात दारुबंदीच्या चळवळीसाठी महिला रस्त्यावर उतरून दारू बंदीसाठी लढा देत असताना राज्याचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी औरंगाबादमध्ये एका बारचं उद्घाटन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यावरून या त्यांच्यावर आता टीकेची झोड उठली आहे. विशेष म्हणजे आज 'ड्राय डे' असताना सुद्धा मंत्री मोह्द्य बारच्या उद्घाटनाला पोहचले.
'यथा राजा तथा प्रजा' या उक्तीनुसार, सरकारने आपल्या आदर्श वागणुकीतून जनतेला काहीतरी शिकवायला हवं. पण राज्याचे मंत्रीच आता लोकांच्या बारचं उद्घाटन करण्यासाठी हेजरी लावत असेल तर,सरकारकडून लोकांनी काय अपेक्षा ठेवावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. भुमरे हे एक अनुभवी नेत्यांपैकी एक समजले जातात, त्यामुळे अशा दिग्गज नेत्यांनी बाराच्या उद्घाटनाला जाने शिवसेनेला शोभणार कृत्य आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोण आहेत भुमरे ?
संदिपान भुमरे हे औरंगाबादमधील शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत. 1995 पासून ते पैठण मतदारसंघातून सलग पाच वेळा ते विधानसभेवर आमदारपदी निवडून आले आहेत. ठाकरे सरकारमध्ये भुमरे हे फलोत्पादन आणि रोजगार हमी विभागाचे मंत्री आहेत.