Home > News Update > आमदार नितेश राणेंविरोधात मुंबईत बॅनरबाजी ; नव्या वादाला फुटले तोंड

आमदार नितेश राणेंविरोधात मुंबईत बॅनरबाजी ; नव्या वादाला फुटले तोंड

शिवसैनिकावर हल्लाप्रकरणी भाजप आमदार नीतेश राणे व संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज काल तिसऱ्या दिवशी न्यायालयाने फेटाळून लावला. यात राणे यांचा मोबाईल हस्तगत करणे आवश्यक असल्याचे कारण देत न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे अज्ञातस्थळी आहेत यावरून मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे. 

आमदार नितेश राणेंविरोधात मुंबईत बॅनरबाजी ; नव्या वादाला फुटले तोंड
X

मुंबई // शिवसैनिकावर हल्लाप्रकरणी भाजप आमदार नीतेश राणे व संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज काल तिसऱ्या दिवशी न्यायालयाने फेटाळून लावला. यात राणे यांचा मोबाईल हस्तगत करणे आवश्यक असल्याचे कारण देत न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे अज्ञातस्थळी आहेत यावरून मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे.

मुंबईतील चर्चगेट या स्थानकाबाहेर एक बॅनर लावण्यात आला आहे. तसंच यात नितेश राणे हरवले असल्याचं म्हटलं आहे. सोबतच माहिती देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस म्हणून देण्यात येईल, असंही बॅनरवर नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, हे बॅनर कोणी लावले याबाबत मात्र माहिती समोर आलेली नाही.

मुंबईतील गिरगावात भाजप कार्यालया शेजारीच आमदार नितेश राणे यांचे बॅनर लावण्यात आले. भाजप आमदार नितेश राणे यांची ओळख सांगणारी माहीतीही या बॅनरवर लिहीण्यात आली आहे. जी नितेश राणे यांना डिवचणारी आहे. त्यामुळे तळ कोकणातील शिवसेना विरुद्ध राणे हा शिमगा आता मुंबईतही सुरू झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी हल्ला झाला होता. याप्रकरणी आतापर्यंत एकूण सहा संशयिताना अटक केली आहे. यामध्ये स्वाभिमानचे पुणे येथील कार्यकर्ते सचिन सातपुते यांना अटक केल्यानंतर पोलिसांची चक्रे आमदार राणे व सावंत यांच्या दिशेने फिरली.

Updated : 31 Dec 2021 9:45 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top