Home > News Update > नांदेडमध्ये जंगलाला भीषण आग, औषधी वनस्पतींसह पक्षीही जळून खाक

नांदेडमध्ये जंगलाला भीषण आग, औषधी वनस्पतींसह पक्षीही जळून खाक

जागतिक वन दिनीच नांदेडच्या किनवट जंगलातील घटना

नांदेडमध्ये जंगलाला भीषण आग, औषधी वनस्पतींसह पक्षीही जळून खाक
X

उन्हाळ्यात जंगलाला आग लागण्याच्या घटना या जंगलातील वन्यजीव प्राणी आणि पक्ष्यांसाठी जीवघेणी घटना असते . जागतिक वन दिनीच नांदेडमध्ये जंगलाला भीषण आग, औषधी वनस्पतींसह पक्षीही जळून खाक नांदेड जिल्ह्यात जागतिक वन दिनीच जंगलाला भीषण आग लागल्याची घटना घडली. किनवट येथील अंबाडी वन क्षेत्राला ही भीषण आग लागली आहे.






मराठवाड्यातील सर्वात मोठे जंगलक्षेत्र असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात जागतिक वन दिनीच जंगलाला भीषण आग लागल्याची घटना घडली. किनवट येथील अंबाडी वन क्षेत्राला ही भीषण आग लागली आहे. धुमसणाऱ्या या आगीत अंबाडी जंगलातील वन औषधींसह पक्षीही जळून खाक झाले आहेत. अभयारण्य असणाऱ्या किनवट-माहूर, इस्लापूर जंगल क्षेत्रात गेल्या महिन्याभरात पाच वेळा भीषण आग लागली आहे. तीन ते चार दिवस जंगलात आग धुमसत आहे. मोहफुले, तेंदूपत्ता, लाकडासाठी जंगल पेटवले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.





मराठवाड्यातील सर्वात मोठे जंगल क्षेत्र म्हणजे जवळपास 67 हजार हेक्टर असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात जागतिक वन दिनीच किनवट येथील अंबाडी वन क्षेत्राला भीषण आग लागली. या जंगल क्षेत्रात वाघ, अस्वल, लांडगा, कोल्हे, नीलगाय, हरीण, काळवीट, बिबट्या असे अनेक वन्यजीव आहेत. तर आयुर्वेदिक वसनस्पती, टेंभी पत्ता, मध, डिंक, लाकूड, मोहफुले हा वन मेवाही मोठ्या प्रमाणात आढळतो.






पण या अनेक औषधी वनस्पतींची खान असणाऱ्या अभयारण्यात उन्हाळा सुरु होताच हा वणवा धगधगू लागल्याचे चित्र आहे. किनवट तालुक्यात जवळपास 67 हजार हेक्टर जंगल क्षेत्र असून, वनविभागाकडे 52 हजार तर वनविकास महामंडळाच्या अखत्यारित 15 हजार जंगल क्षेत्र आहे. बऱ्याच जंगलात वनीकरण झाले आहे. दरम्यान, जंगलातील गस्ती पथके फक्त नावालाच असल्याचीही चर्चा होत आहे. अभयारण्यातील पाणवठ्याचेही नियोजन नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

Updated : 21 March 2022 4:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top