'या' मुद्द्यांवर काँग्रेस लढणार विधानसभा निवडणूक...
Max Maharashtra | 21 Sept 2019 6:34 PM IST
X
X
निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात आचारसंहीता लागू केल्यानंतर राजकीय वर्तुळात निवडणुकांचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.“21 तारखेला राज्यातील निवडणुक लढवण्यासाठी काँग्रेस सज्ज झालं आहे. सरकारच्या विरोधात काँग्रेसने आंदोलनही केली आहेत. सरकार विरोधात आम्ही कामं केली आहेत या पार्श्वभूमीवर आम्ही निवडणुकीला सामोरं जातो आहे.” असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पूर्ण तयारी असल्याचं सांगत या निवडणुकीत जनता काँग्रेसलाच निवडणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, देशात मंदीची परिस्थिती असताना शेती मालाला बाजारपेठ नाही, पुराची परिस्थिती हाताळण्यासाठी सरकार अपयशी ठरलंय, बेरोजगारी वाढली आहे. सरकारने जनतेचे जे प्रश्न आहेत त्यांच्याकडे दुलर्क्ष केलं आहे.” अशी खंत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. काय आहे बाळासाहेबांची निवडणुकीची रणनीति? पाहा व्हिडीओ...
https://youtu.be/jhaQHnsrM7Y
Updated : 21 Sept 2019 6:34 PM IST
Tags: Balasaheb Thorat bjp CM devendra Fadanavis congress Election Commission Of India Maharashtra Election 2019 Narebdra Modi sachin sawant
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire