Home > News Update > बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला राजकीय दिशा दिली : संजय राऊत

बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला राजकीय दिशा दिली : संजय राऊत

बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला राजकीय दिशा दिली : संजय राऊत
X

बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी बोलताना आणि सांगताना आजही आम्हाला वाटतं की ते आमच्या आसपास आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला खऱ्या अर्थाने राजकीय दिशा दिली असे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटले आहे. बाळासाहेब असते तर बऱ्याच या गोष्टी झाल्या नसत्या विशेषतः जी विरोधी पक्षांमध्ये आज-काल कावकाव चिवचिव चालू आहे जी तडफड सुरू आहेत ती बाळासाहेबांच्या अस्तित्व आणि थंड पडली असती.

बाळासाहेबांचा शब्द म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण होता.त्यांचे जीवन म्हणजे धगधगता अग्निकुंड होतं मराठी माणूस त्यांचा सदैव ऋणी राहील आज या देशात आपण मराठी म्हणून जे अभिमानाने जगत आहोत ते बाळासाहेबांमुळेच.बाळासाहेब नसते तर मी नसतो. सामान्यातल्या सामान्य माणसाला शूरवीर करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. बाळासाहेब दुसरे निर्माण होणार नाहीत.बाळासाहेब सांगायचे कि एके काळी मी कुंचला हाती घेतला आणि फटकारे मारले की अनेक जण थरथरायचे.

ज्यावेळी त्यांनी कुंचला खाली ठेवला त्यावेळी त्यांनी सांगितलं की आता राजकारणात तशी मॉडेल्स राहिलेली नाहीत. अचानक जेव्हा देशाच्या राजकारणात सोनिया गांधी आल्या नरसिंह राव आले सिताराम आले त्यावेळी त्यांनी म्हटलं की मी माझी ही मॉडेल्स मिस केली आज देशात मोदी आहे फडणवीस आहेत अमित शहा आहेत जी देशात गडबड चालू आहेत जर बाळासाहेब असते तर त्यांना आजही हातात कुंचला घेऊन फटकारे मारावे असे वाटले असते, असं राऊत म्हणाले.

गोव्यामध्ये असं चित्र आहे जे मुळचे भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत ते बाहेर पडत आहेत.उत्पल पर्रीकर यांनी पक्षाचा त्याग केला आहे लक्ष्मीकांत पारसीकर जरी भारतीय पक्षाचा मुख्य चेहरा आहे आज हे सगळे बाहेर पडत आहेत आणि भ्रष्टाचाराचे व्यभिचाराचे खंडणीचे आरोपी असणारे हौशे नवशे भारतीय जनता पक्षाचे चेहरे झाले आहेत, मुंबईच्या भाषेत सांगायचं झालं तर ये पब्लिक है सब जानती है असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

महाराणा प्रताप यांना एम आय एम चा विरोध का आहे.मोगलांविरुद्ध आहेत त्यांची तलवार चालली त्यांनी हिंदूंचे रक्षण केलं हिंदू महिलांना संरक्षण दिलं हिंदू मंदिरांचा रक्षण केलं. जर कोणी महाराणा प्रताप शिवाजी महाराज यांची तलवार आमच्या हातात आहे हे लक्षात ठेवावं, असं राऊत यांनी स्पष्ट केले.


Updated : 23 Jan 2022 3:51 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top