बुल्ली बाई आणि सुली डील्स अॅप प्रकरणी आरोपींना जामीन मंजूर
सध्या या 4G आणि 5G च्या युगात सायबर क्राइम खुप वाढले आहेत. अश्याच एका अॅपद्वारे अल्पसंख्याक महिलांची बदनामी केली जात होती.त्यामुळे सायबर सुरक्षिततेअंतर्गत त्यांना गुन्हा दाखल झाला होता. आता त्या आरोपींना दिलासा मिळाला आहे. बुल्ली बाई आणि सुली डील्स अॅप प्रकरणी आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला आहे.
X
बुल्ली बाई अॅप प्रकरणातील आरोपी नीरज बिष्णोई आणि सुली डील्स अॅप तयार करणारा ओंकारेश्वर ठाकूर याला मानवीय आधारावर जामीन मंजूर करण्यात आला. दिल्लीतील कोर्टाने हा सशर्त जामीन मंजूर केला. आरोपींनी पहिल्यांदा गुन्हा केला आहे, त्यामुळे तुरुंगवासात राहिल्यास त्यांच्यादृष्टीने हानीकारक ठरू शकते असेही कोर्टाने म्हटले.
कोर्टाने जामिन देताना आरोपींसमोर काही अटी ठेवल्या आहेत.कोणत्याही साक्षीदाराला न धमकावणे पुराव्यांसोबत छेडछाड करु नये या अटी ठेवल्या आहेत.आरोपीने कोणत्याही पीडित व्यक्तीला संपर्क करणे, त्यांना आमिष दाखव्यण्याचा प्रयत्न करु नये.अशा सूचना कोर्टाने दिल्या आहेत.
जामीनावर असताना आरोपीने आपला संपर्क क्रमांक आणि वास्तव्याची माहिती अधिकाऱ्याला द्यावी. आरोपी आपला फोन कायम सुरू ठेवणार, तसेच आपल्या ठावठिकाण्याची माहिती देईल. आरोपीने देश सोडू नये.असे आरोपींना बजावण्यात आले आहे.