Home > News Update > आ. बच्चू कडू यांच सचिन तेंडूलकरला अल्टिमेटम!

आ. बच्चू कडू यांच सचिन तेंडूलकरला अल्टिमेटम!

आ. बच्चू कडू यांच सचिन तेंडूलकरला अल्टिमेटम!
X

प्रहार संघटनेचे आमदार, माजी राज्य मंत्री बच्चू कडू यांनी मास्टर ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना अल्टिमेटम दिलं आहे. सचिनला १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. सचिनने ऑनलाइन जाहिरातीतून माघार घ्यावी, नाहीत त्यांचा घरासमोर आंदोलन करु, असा थेट इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे.

बच्चू कडू म्हणाले की, " सचिन तेंडूलकर यांच्या घरी जाऊन प्रहार टाईप आंदोलन करणार आहोत. भारतरत्न असलेले सचिन तेंडूलकर यांनी यावर स्पष्टीकरण दिले पाहीजे. या भारताचा ते अभिमान आहेत. ऑनलाइन गेमच्या जाहिरातीतून त्यांनी माघार घ्यावी. सचिन यांनी या जाहिरातीतून माघार घ्यावी यासाठी सचिनला 15 दिवसाचा अल्टिमेटमही दिला असल्याचं बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

भारतीयांची ऑनलाईन गेममधून मुक्तता व्हावी म्हणून आम्ही सचिन तेंडूलकर यांना नारळ पाणी देऊ. पालकांमध्ये प्रचंड रोष आहे. गेममध्ये अधिक पैसे गुंतवू नका, अशी जाहिरात करायची आणि दुसरीकडे गेमची जाहिरात करायची, असे धंदे सुरु आहेत.

बच्चू कडू यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र दिले होते. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.

शिंदेंना दिलेल्या पत्रावरुन कडू म्हणाले,"सचिन तेंडुलकर हे प्रसिध्द क्रिकेटर असून भारतात त्यांचे लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत चाहते आहेत. त्यामुळे ते करित असलेल्या जाहीरातींचा परिणाम लहान थोर सर्व स्तरापर्यंत होतोय जुगाराच्या जाहिरातीला महाराष्ट्रातील जनता बळी पडत असून त्यांचे कौटुंबिक आयुष्य उद्वस्त देखील होत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी बऱ्याच जणांकडून माझ्यापर्यंत प्राप्त झाल्या आहेत."

Updated : 11 Aug 2023 6:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top