आम्ही एकनाथ शिंदे यांचे आयुष्यभर गुलाम राहू- बच्चू कडू
X
राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे. मात्र विस्तार होत नसल्याने बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यावर बच्चू कडू यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे. पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत आल्यानंतर मंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे बच्चू कडू नाराज असल्याची चर्ची रंगली होती. त्यावर बच्चू कडू यांनी भूमिका मांडली. मात्र यावेळी बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचेही आभार मानले.
बच्चू कडू म्हणाले, आम्हाला अनेकवेळा अनेकांनी आमिष दिले. तरीही आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहीलो. पण जर उद्धव ठाकरे यांनी दिव्यांग मंत्रालय दिलं असतं तर आम्हाला गुवाहाटीला जायची वेळ आली नसती. तसेच एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं. त्यामुळे आम्ही त्यांचे आयुष्यभर गुलाम राहू, असंही बच्चू कडू म्हणाले.
मी मंत्री पदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो, पण मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर मी माझा निर्णय घेणार आहे. मी माझा निर्णय 18 तारखेनंतर जाहीर करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी फार विनंती केली म्हणून मी सध्या निर्णय मागे घेत आहे. पद घेतल्यापेक्षा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करायची इच्छा आहे.