अयोध्या : रामलल्लाची मूर्ती हलवली राम मंदिरासाठी पहिलं पाऊल
X
अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी योगी आदित्यनाथ सरकारनं पहिलं पाऊल उचललं आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर रामजन्मभूमी परिसरातील तंबूतील रामलल्लाच्या मूर्तीची याच परिसरात तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत: ही मूर्ती उचलून नेऊन या मंदिरात मूर्तीची स्थापना केली. या मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीसाठी खास चांदीचं सिंहासन तयार करण्यात आले आहे.
मंत्रोच्चारांचा गजरात इथं रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पण या कार्यक्रमावरही कोरोनाचं सावट जाणवलं. पहाटे पाच वाजता ही प्रतिष्ठापना करण्यात आली. पण यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचं पालन करण्यात आलं. रामलल्लाची पूजा आणि आरती केल्यानंतर मुख्यमंत्री योगा आदित्यनाथ हे लगचेच तिथून गोरखपूरला निघूनन गेले. यावेळी राममंदिराच्या उभारणीसाठी योगी आदित्यनाथ यांनी मंदिर ट्रस्टला ११ लाखांच्या देणगीचा चेकही दिला.