... अनं धर्मनिरपेक्षवादी RSS च्या दरबारी
X
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्वत: ला धर्मनिरपेक्षवादी म्हणून घेणारे आयाराम आमदार चक्क RSS च्या दरबारी पाहायला मिळालेत. राधाकृष्ण विखे–पाटील, गणेश नाईक, जयकुमार गोरे यांच्यासह अनेक आमदार RSS च्या अभ्यास वर्गासाठी हजर होते.
हेडगेवार स्मारक समितीच्या वतीने भाजपाच्या सगळ्या आमदारांसाठी आज अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला होता. यावेळी महानगर सरसंघचालक राजेश लोया यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. हिंदुत्ववादी विचारधारेच्या संघाविरोधात नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी उभी असते. त्यामुळे पक्षातंर केलेल्या धर्मनिरपेक्षवादी आमदारांना कशाप्रकारे सत्ता आणि राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आपल्या विचारांना बाजूला ठेऊन तडजोड करायला लावते याचं उत्तम उदाहरण हे सांगता येईल.
हे ही वाचा...
डॉ. श्रीराम लागू काळाच्या पड्याआड
आश्रम शाळेत मुलींना विषबाधा, लैंगिक शोषणाची शंका ?
“पुर्वी मी काँग्रेसमध्ये काम केलं पण काँग्रेसने देखील आपली विचारधारा कायम ठेवली नाही. सत्तेसाठी काँग्रेसला देखील शिवसेनेसोबत तडजोड करावी लागली. त्यामुळे मी आता ज्या पक्षात आहे त्या पक्षाच्या विचारधारेशी जुळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे दुसरी बाजूही शिकायला मिळेल.” असं मत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केलयं.