Home > News Update > औरंगाबाद महापालिका आता केवळ इलेक्ट्रिक वाहनेच खरेदी करणार ; प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्णय

औरंगाबाद महापालिका आता केवळ इलेक्ट्रिक वाहनेच खरेदी करणार ; प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्णय

औरंगाबाद महापालिका आता केवळ इलेक्ट्रिक वाहनेच खरेदी करणार ; प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्णय
X

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी औरंगाबाद महापालिकेने (Aurangabad corporation) इलेक्ट्रिक वाहनांचा (E vehicle) वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे महानगर पालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसाठी डिझेल किंवा पेट्रोलचे नवीन वाहन खरेदी केली जाणार नाही. त्याऐवजी फक्त इलेक्ट्रिक वाहनेच वापरली जातील. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीपैकी 80 टक्के रक्कम ही प्रदूषण कमी करण्यावर खर्च करावी, असं शासनाने सांगितल्याचे औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांनी म्हटले आहे.

महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले की, प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचे धोरण आखले आहे. पुढील काळात इलेक्ट्रिक वाहने रस्त्यांवर मोठ्या संख्येने उतरणार आहेत. दरम्यान स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने स्मार्ट सिटी अभियानातील अधिकाऱ्यांसाठी 5 इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचे ठरवले आहे. त्यापाठोपाठ महापालिकेतसुद्धा यापुढे इलेक्ट्रिक वाहनेच खरेदी केली जाणार आहे.

Updated : 7 Nov 2021 10:55 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top