औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर', उस्मानाबादचे 'धाराशिव', राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी...
X
औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर', तर उस्मानाबादचे 'धाराशिव' असे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे.
औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर', उस्मानाबादचे 'धाराशिव'...राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र केंद्र सरकारची मंजुरी...मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोट-कोटी आभार...मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने करुन दाखवले...मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाहा यांचे कोटी कोटी आभार...मुख्यमंत्री असं ट्विट उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
राज्यातील दोन महत्त्वपूर्ण शहराचे बदलण्याच्या नावावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. हा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला होता. पण त्याला आज केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. त्याचे नोटीफिकेशन सुद्धा आज केंद्र सरकारने काढले. मराठवाड्यातील औरंगाबाद हे नाव मोगलाईचे प्रतिक असल्याने ते नाव बदलण्याचे प्रयत्न शिवसेनेच्या काळापासून सुरु होते त्याला आज मूर्त स्वरुप आले आहे. आता यापुढे औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर', तर उस्मानाबादचे 'धाराशिव' या नावाने ओळखली जाणार आहेत.