Home > News Update > १४ ऑगस्ट हा दिवस "फाळणी स्मृती दिन" म्हणुन घोषित, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

१४ ऑगस्ट हा दिवस "फाळणी स्मृती दिन" म्हणुन घोषित, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

१४ ऑगस्ट हा दिवस फाळणी स्मृती दिन म्हणुन घोषित, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
X

रविवारी १५ ऑगस्ट रोजी भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पुर्ण होतील. त्या आधी १४ ऑगस्टला भारताची फाळणी होऊन पाकिस्तान स्वतंत्र झाला होता. परंतू या फाळणी दरम्यान कोट्यावधी नागरीकांना दोन्ही देशांमध्ये स्थलांतर करावे लागले होते. या स्थलांतरणावेळी हजारो नागरिकांना पाकिस्तानमध्ये अत्याचाराला सामोरे जावे लागले होते. त्याच क्षणांना उजाळा देत पंतप्रधानांनी १४ ऑगस्ट हा दिवस "फाळणी स्मृती दिन" म्हणुन घोषित केला आहे. हा दिवस सर्व भारतीयांना यानिमित्ताने एकत्र आणत मानवी संवेदनांना बळकट करेल असं पंतप्रधानांनी ट्विटर वर म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणतात, " देशाच्या फाळणीची वेदना कधीच विसरता येणार नाही. द्वेष आणि हिंसाचारामुळे, आमच्या लाखो बहिणी आणि बांधव विस्थापित झाले आणि त्यांचे प्राणही गेले. त्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ १४ ऑगस्ट हा 'फाळणी स्मृती दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा दिवस आपल्याला केवळ भेदभाव, वैमनस्य आणि द्वेष नष्ट करण्यासाठी प्रेरित करणार नाही, तर तो आपल्यातील एकता, सामाजिक सौहार्द आणि मानवी संवेदनांनादेखील बळकट करेल."

Updated : 14 Aug 2021 6:41 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top