Home > News Update > सुवर्ण मंदिरात गुरु ग्रंथ साहिब यांचा अपमान करण्याचा प्रयत्न; जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

सुवर्ण मंदिरात गुरु ग्रंथ साहिब यांचा अपमान करण्याचा प्रयत्न; जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

पंजाबमधील अमृतसर येथील प्रसिद्ध सुवर्ण मंदिरात एक धक्कादायक घटना घडली आहे. गुरु ग्रंथ साहिब यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला जमावाने मारहाण करत ठार केलं आहे.

सुवर्ण मंदिरात गुरु ग्रंथ साहिब यांचा अपमान करण्याचा प्रयत्न; जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू
X

अमृतसर// पंजाबमधील अमृतसर येथील प्रसिद्ध सुवर्ण मंदिरात एक धक्कादायक घटना घडली आहे. गुरु ग्रंथ साहिब यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला जमावाने मारहाण करत ठार केलं आहे. पोलिसांनी हत्येच्या घटनेला दुजोरा दिला असून, घटनेनंतर सुवर्ण मंदिर परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.

रेहरास साहिब पाठ सुरु असताना एका अज्ञात व्यक्तीने रेलिंगवरुन उडी मारली आणि कथितपणे गुरु ग्रंथ साहिब यांच्यासमोर ठेवलेल्या तलवारीला हात लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तेथील जमावाने तरुणाला बाहेर नेलं आणि बेदम मारहाण केली. या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाला. पंजाबच्या गृहमंत्र्यांनी देखील याला दुजोरा दिला आहे.

अमृतसर शहराचे डीजीपी परमिंदर सिंग यांनी सांगितले की, "एका 24-25 वर्षीय तरुणाने पवित्र पुस्तक ठेवण्यात आलेल्या ठिकाणी घुसखोरी केली. त्याने तलवारीला हात लावण्याचा प्रयत्न केला. त्याला जमावाने पकडून बाहेर नेलं असता बाचाबाची झाली आणि त्यानंतर झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला".

तरुणाचा मृतदहे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून हा तरुण एकटाच होता असं वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे अशी माहिती परमिंदर सिंग यांनी दिली आहे.

Updated : 19 Dec 2021 9:18 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top