अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
X
अहमदनगर : अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव , शेंडगेवाडी येथील शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे, अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला, मात्र पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत शेतकऱ्यांच्या हातातील इंधनाने भरलेल्या बाटल्या काढून घेत शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.
श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी संतोष होले आणि इतर आंदोलक शेतकऱ्यांच्या शेतातून जाणाऱ्या भारत गॅस पाईपलाईनमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे , वास्तविक ही पाईपलाईन शेताच्या आणि रस्त्याच्या मधून नेण्यास परवानगी असताना भारत गॅसने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांतून पाईपलाईन टाकण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे
त्याविरोधात संबंधित प्रशासनाला वारंवार विनंती करून देखील प्रशासन, जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता.त्यानुसार आज शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, दरम्यान यावेळी बोलताना शेतकऱ्यांना प्रशासनाच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केला, वारंवार संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठका होऊन देखील तोडगा निघाला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी
हे टोकाचे पाऊल उचलले आहे. दरम्यान आता तरी प्रशासनाला जाग येणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.