धार्मिक द्वेषातून मिरवणूकीवर हल्ला; मीरा-रोड मधील घटना
संपूर्ण देशात राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंद साजरा होत आहे. अशातच काल राञी रविवारी मीरा-रोड परिसरात राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमीत्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीवर काही समाजकंटकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
X
संपूर्ण देशात राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंद साजरा होत आहे. अशातच काल राञी रविवारी मीरा-रोड (Mira Road) परिसरात राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमीत्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीवर काही समाजकंटकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
या हल्ल्यात हाणामारी झाली ज्यामध्ये 4 तरुण जखमी तर 20 किरकोळ जखमी झाले आहेत तसेच वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत दंगल करणे, समाजात तेढ निर्माण करणे तसेच हत्येचा प्रयत्न करणे अशा विविध कलमांअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून परिस्थिती सध्या नियंञणात आहे.
पोलीसांकडून नागरीकांना शांततेचे आवाहन
शनिवारी झालेल्या वादाचे पडसाद मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर दिसू लागलेत. रविवारी राञी बरेच तरुण भाईंदर पश्चिम इथल्या पंडीत भीमसेन जोशी रुग्नालयाच्या बाहेर जमा झाले होते त्यामूळे शहरातील वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान रविवारी किरकोळ कारणावरुन दोन गटात वाद होऊन तो आता शांत झाला आहे. त्यामूळे नागरीकांनी कूठल्याही अफवांवर विश्वास व ठेवता वातावरण शांत ठेवावे, असे आवाहन नया नगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विलास यांनी केले आहे.