Home > News Update > दोन गटाचे भांडण सोडण्यास गेलेल्या पोलिसावर चाकूने वार

दोन गटाचे भांडण सोडण्यास गेलेल्या पोलिसावर चाकूने वार

दोन गटाचे भांडण सोडण्यास गेलेल्या पोलिसावर चाकूने वार
X

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिसावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गणेश डमाले हे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

उल्हासनगरच्या कॅम्प-४ भागात गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.याठिकाणी पैशांच्या व्यवहारातून दोन गटात तुंबळ हाणामारी सुरु होती. दोन्ही गटांनी एकमेकांवर हत्यारं उगारली होती. त्याचवेळी पोलीस अंमलदार गणेश डमाले आणि गणेश राठोड हे गस्तीवर होते. हाणामारीचा प्रकार बघून त्यांनी तो थांबवण्याचा प्रयत्न केला.मात्र, यावेळी त्यातील एका गटाने थेट पोलिसांवरच चाकूने वार करत त्यांना गंभीर जखमी केलं. शस्त्र नसतानाही पोलिसांनी हिंमतीने मध्ये पडत हा हल्ला थांबवण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पोलीस अंमलदार गणेश डमाले हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी केली नसती, तर दोन्ही गटातील लोकांच्या हत्या झाल्या असत्या, अशीही माहिती समोर आली आहे. याप्रकरणी विट्ठलवाडी पोलिस ठाण्यात हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पडण्यासाठी ४ पथके रवाना करण्यात आली आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.

Updated : 16 Oct 2021 5:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top