डीजे वाजवण्यास मनाई केल्याने, पोलीस ठाण्यावर हल्ला...
कायद्याच्या रक्षकांवर हल्ले करण्याच्या घटना वाढीस लागल्या असून बुलडाणा जिल्ह्यातील शेगावमधे डीजे वाजवण्यास पोलिसांनी मनाई केल्यामुळं पोलिस ठाण्यावर हल्ला करुन पोलीस स्टेशन मधील साहित्याची तोडफोड केली आहे या प्रकरणी सात ते आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत...
X
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील विश्वनाथ नगर मध्ये रात्री बारा वाजल्यानंतर वाढदिवसाच्या निमित्ताने काय मुलांनी डीजे वर गाणे वाजवत मस्ती सुरू केली होती, डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याने, त्यांनी पोलिसांना माहिती दिली, त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन डीजे बंद करण्याच्या सूचना केल्या, मात्र पोलीस निघून आल्यानंतर या तरुणांनी पुन्हा मोठ्या आवाजात डीजे वाजवायला सुरुवात केल्याने, एक दीड वाजताच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळी जाऊन एका जणाला ताब्यात घेऊन त्याला पोलीस ठाण्यात घेऊन आले.. त्यामुळे डीजे वाजवण्यास बंदी करत एकाला ताब्यात घेतल्याने संतप्त तरुणांनी शहर पोलिस स्टेशन गाठत, पोलीस स्टेशन मध्ये चांगलीच तोडफोड केली, ज्यामध्ये फर्निचर सह इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे..
सोबतच सेवेवर असलेले सहायक पोलिस निरीक्षक गौतम इंगळे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना देखील या तरुणांनी लोटपाट करत, मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे...पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीला या तरुणांनी पळवून नेले आहे, यातील काही तरुण हे सैन्यात असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून सात ते आठ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असल्याची माहिती आहे... मात्र अद्याप पर्यंत पोलिस विभागाकडून अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे, परंतु दुसरीकडे आता जनतेचे संरक्षण करणारे पोलिसच सुरक्षित नसल्याचे चित्र बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झाले आहे...