Home > News Update > ठाणे पालिका अधिकारी महेश आहेरवर कारवाई शहर काँग्रेसची मागणी

ठाणे पालिका अधिकारी महेश आहेरवर कारवाई शहर काँग्रेसची मागणी

दोन दिवसांपूर्वी ठाणे महानगर पालिकेची अधिकारी महेश आहेर यांना पालिका मुख्यालयाच्या गेटवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्रआव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. यावर आता शहर काँग्रसने आहेर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ठाणे पालिका अधिकारी महेश आहेरवर कारवाई शहर काँग्रेसची मागणी
X


ठाणे महापालिकेचे अधिकारी महेश आहेर यांना महापालिका मुख्यालयासमोर झालेल्या हल्ल्या संदर्भात कॉंग्रेसने आपली भुमिका आज स्पष्ट केली आहे. सचिन शिंदे यांनी सांगितले आहे की, काल झालेल्या मारहाण प्रकरणाचे आम्ही कधीच समर्थन करणार नाही. परंतु ही मारहाण का झाली? याचाही आढावा घेणे सुद्धा गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महेश आहेर यांच्यावर अनाधिकृत बांधकाम, सार्वजनिक मालमत्ता, धमकावणे, असे विविध आरोप होत आहे. त्यांची विभागीय चौकशी सुरु असताना ते त्याच विभागाचा कार्यभार सांभाळत आहेत. कोणाच्या आर्शिवादाने त्यांच्याकडे या विभागाचा कार्यभार देण्यात आला? असा सवाल ही यावेळी सचिन शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

एक वर्षांपूर्वीही ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सुद्धा महेश आहेर यांच्यामार्फत घाटकोपर येथे बोलावून धमकावण्यात आल्याचा आरोप केला होता. त्याची तक्रारही पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली होती. मात्र वर्षभरानंतरही त्याच पदावर राहिलेल्या अधिका-याची साधी चौकशीही होत नसल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामुळे याबाबत सरकारने योग्य भूमिका घेतली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ४० लाखाच्या वक्तव्याची सत्यता पडताळून पाहिली पाहीजे, अशी मागणी देखील सचिन शिंदे यांनी केली. महेश आहेर यांच्या चौकशा सुरु असताना उलट त्या बदल्यात विविध पदांची बक्षिसी मिळत आहे. हे कसे शक्य आहे. आहेर यांना पाठीशी घालण्याचे काम विविध पद्धतीने केले जात आहे. त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राहुल पिंगळे यांनी केली.

Updated : 16 Feb 2023 9:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top