रामनवमीच्या दिवशी होणारा नास्तिक मेळावा रद्द
X
भगतसिंग (bhagat singh)विचारमंच दरवर्षी नास्तिकांचा मेळावा आयोजित करत असतो.कोरोना काळानंतर भरणारा पहिला नास्तिक मंडळींचा पुण्यातील मेळावा रद्द करण्यात आला आहे.
पुण्यातील (pune)एस एम जोशी सभागृहात हा मेळावा होणार होता. मात्र या दिवशी रामनवमी आहे.आणि आमच्या भावना दुखावण्यासाठी मुद्दाम हा दिवस निवडण्यात आल्याचा आरोप मेळाव्यावर करण्यात आला.या आक्षेपामुळे पुणे पोलिसांनी मेळाव्याच्या आयोजकांना तो रद्द करण्यासाठी आग्रह केला.पोलिसांवर वाढता ताण घेता हा मेळावा रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी जाहिर केला.महाराष्ट्रातील अनेक मंडळी यासाठी येणार होती.मात्र ते तेथे पोहोचवण्याच्या आधीच मेळावा रद्द झाल्याने त्यांनाही प्रवासाचा भुर्दंड बसला आहे.
नास्तिकांचा मेळावा झाल्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरु झाली आहे.नावात फक्त फुले-शाहू आंबेडकर , अशी नावे घ्यायची आणि प्रबोधनाचे कार्यक्रम बंद पाडायचे, असा सूर या निमित्ताने काहींनी लावला आहे.
सर्वात पहिला मेळावा भगत सिंग स्मृती दिवसानिमित्त २३ मार्च २०१४ मध्ये झाला होता. ज्याचे अध्यक्षपद डॉ श्रीराम लागू यांनी भूषवले होते. त्यानंतर पुढील सहा वर्षे अनेक दिग्गज वक्त्यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले आहे . मागील दोन वर्षात कोरोनामुळे मेळावा घेता आला नाही. मात्र यावर्षी मेळावा मोठ्या धामधुमीत करण्याचे नियोजन होते. यावर्षी शरद बाविस्कर आणि तुकाराम सोनावणे हे वक्ते म्हणून येणारे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुग्धा कर्णिक असणार होत्या.