मोठी बातमी : यवतमाळ येथे काल्याच्या जेवणातून ४५ जणांना विषबाधा; एका महिलेची प्रकृती चिंताजनक
आर्णी तालुक्यातील अंजी नाईक येथे पंगतीच्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना सोमवारी १६ ऑगस्टला रात्री ८ च्या दरम्यान घडली आहे.
X
यवतमाळ येथे आर्णी तालुक्यातील अंजी नाईक येथे रवी राठोड यांच्या घरी गेल्या सात दिवसांपासून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी काल्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेवणाची पंगत सुरू असताना वीज पुरवठा खंडित झाला. जेवण झाल्यावर नागरिकांना अतिसार आणि उलटीचा त्रास जाणवू लागला. तब्बल ४५ जणांना आर्णी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला यवतमाळ येथे हलविण्यात आले.
आर्णी तालुक्यातील अंजी नाईक येथे ४५ जणांना पंगतीच्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना सोमवारी १६ ऑगस्टला रात्री ८ च्या दरम्यान घडली आहे. अंजी नाईक येथे धार्मिक कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमाला नातेवाईकांसह शेजारच्या नागरिकांना निमंत्रण देण्यात आले होते. तसेच कार्यक्रमामध्ये जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी रात्री ८ च्या दरम्यान जवळपास ४५ जण या कार्यक्रमात जेवण करुन आप-आपल्या घरी निघून गेले.
मंगळवारी १७ ऑगस्टला या सर्वांना पहाटे ४ च्या दरम्यान पोटात दुखणे, अतिसार व उलट्या सुरु झाल्या. गावातील नागरिकांनी सर्वांना भांबोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. परंतु काहींची तब्बेत खालावत असल्याने त्यांना पुढिल उपचाराकरिता आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी एका महिलेला व मुलाला पुढील उपचाराकरिता यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविले आहे.
तसेच विषबाधा झालेल्या व्यक्तींवर भांबोरा येथील वैद्यकीय अधिकारी पवार व आर्णी येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनिल भवरे व नितिन लकडे यांनी तत्काळ उपचार करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.
जेवनातून विषबाधा झालेले नागरिक
अंजी नाईक येथील पंगतीच्या जेवणात विषबाधा झालेल्या नागरिकांमध्ये विशाल चव्हाण, खुशाल चव्हाण, युवराज चव्हाण, ममता चव्हाण, छकुली चव्हाण, नवीन चव्हाण, संजय राठोड, विष्णू चव्हाण, राजू पवार, सुरज राठोड, हर्षद राठोड, गोपाल पवार, प्रवीण राठोड, दिनेश राठोड, किसनबाई राठोड, धनश्री राठोड, मंजी चव्हाण, मोहन राठोड, बलदेव चव्हाण, मनिष राठोड, विवेक राठोड, सुरेश राठोड, धीरज राठोड, धनसिंग राठोड, रवी राठोड, गजानन राठोड, रेखा राठोड, पद्मा राठोड, प्रतीक्षा राठोड, भूमिका राठोड, शोभा राठोड, शीतल राठोड, अरविंद राठोड, सुखदेव राठोड, विवेक राठोड, उमेश राठोड, गणेश राठोड, जितेंद्र राठोड, विजय राठोड, मधुकर राठोड, सुनिता राठोड व गजानन जाधव यांचा समावेश असून सर्वांवर आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.