खगोल विज्ञानातील तारा निखळला, प्रा. प. रा. आर्डे यांचे निधन
खगोल शास्राचे अभ्यासक आणि अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. प. रा आर्डे यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले.
X
अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे सोबती प्रा. प. रा. आर्डे यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. ते 20 वर्षे अंधश्रध्दा निर्मुलन वार्तापत्राचे संपादक होते. यामध्ये त्यांनी फसवे विज्ञान, वेध विश्वाचा मानवी शौर्याचा यांसारखी महत्वपुर्ण पुस्तकं त्यांनी लिहीली. तसेच शेवटपर्यंत त्यांनी व्याख्याने, शिबीरांच्या माध्यमातून खगोल विज्ञान आणि अंधश्रध्दा या विषयांवर प्रबोधन केले.
प्रा. आर्डे यांच्या मृत्यूने अंधश्रध्दा निर्मुलन वार्तापत्राचा आधारवड कोसळल्याची प्रतिक्रीया अंधश्रध्दा निर्मुलन वार्तापत्राचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी दिली.तसेच त्यांनी मांडलेले खगोल विज्ञानासंबंधीचे विचार त्यांनी केलेले संशोधन पुस्तकांच्या रुपाने येत्या पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील. तसेच त्यांचे शेवटचे व्याख्यान मॅक्स महाराष्ट्रवरून पुनःप्रसिध्द करण्यात येत आहे.