Adani Group मध्ये गुंतवणूक केलेले मालामाल, एकाच दिवसात समूहाचं बाजारमूल्य ५० हजार ५१० कोटी रूपये
X
देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली होती, ते आज मालामाल झालेले आहेत. अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यामुळं एकाच दिवसात अदानी समूहाचं बाजारमूल्य (MCap) हे 50 हजार ५०१ कोटी रूपयांपेक्षा अधिक झालंय.
अदानी समूहाचं एकूण बाजारमूल्य
मंगळवारी बीएसईचं काम संपेपर्यंत अदानी समूहाच्या १० कंपन्यांचं एकूण बाजारमूल्य १०.६ लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक होतं. हेच बाजारमूल्य मागील वर्ष १०.१ लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे. शेअर मार्केट तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शेअर बाजारातील या तेजीमागे स्थानिक गुंतवणूकदारांनी दाखवलेली रूची आहे.
अप्पर सर्किटपर्यंत पोहोचलेल्या अदानी समूहाच्या कंपन्या
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL), अदानी टोटल गॅस लिमिटेड (ATGL) आणि एनडीटीव्ही या कंपन्यांनी अप्पर सर्किट पर्यंत झेप घेतली. आज अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड च्या शेअर्समध्ये १० टक्क्यांची वाढ तर अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये ९.३ टक्क्यांची वाढ झाली. एनडीटीव्ही अप्पर सर्किट वर पोहोचून ४.९९ टक्क्यांची वाढ केली आणि शेअर २३८ रूपयांवर येऊन थांबला.
अदानी समूहाच्या इतर कंपन्यांचेही शेअर्स वाढले
अदानी इंटरप्राईझेसचे शेअर्स २ टक्क्यांनी वाढले त्यामुळं अदानी इंटरप्राईझेस चे बाजारमूल्य वाढून २.८१ लाख कोटी रूपये झालं. अदानी ट्रान्समिशनचे शेअर ८ टक्क्यांनी वाढले आणि कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढून ८३४.८० रूपयांपर्यंत पोहोचले, त्यामुळं अदानी ट्रान्समिशन चं बाजारमूल्य ९३ हजार १२१ कोटी रूपये झाले.
एटीजीएल या कंपनीत ५ टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळं या कंपनीचं बाजारमूल्य ७२ हजार ८५६ कोटी रूपये इतकं झालं. अदानी पोर्ट्स च्या शेअर्समध्ये १.९० टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळं ७४९.३५ रूपयांवर या कंपनीचे शेअर्स पोहोचले. त्यामुळं या कंपनीचं बाजारमूल्य वाढून १ लाख ६१ हजार ८७० कोटी रूपये झाले.
अदानी विल्मर च्या शेअर्स मध्ये ४.५७ टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळं या कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढून ४१६.६५ रूपये झाली. त्यामुळं या कंपनीचं बाजारमूल्य वाढून ५४ हजार १५१ कोटी रूपये झालं.
अदानींच्या सिमेंट उद्योगातील अंबुजा सिमेंट्स या कंपनीच्या शेअर्समध्ये आज ४.१० टक्क्यांची वाढ झाली, त्यामुळं त्यांचं बाजारमूल्य ८७ हजार ४१८ कोटी रूपये झाले. तर दुसरीकडे एसीसी सिमेंट या कंपनीच्या शेअर्समध्ये ४.८३ टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळं या कंपनीचं बाजारमूल्य ३५ हजार ५२८ कोटी रूपये झाले.
अदानी समूहानं गुंतवणूकदारांमध्ये निर्माण केलेल्या विश्वासाचे परिणाम
हिंडेनबर्ग रिसर्च च्या अहवालानंतर काहीसा बॅकफूटला गेलेल्या अदानी समूहानं शेअर मार्केटमध्ये अचानक उसळी मारलीय. अदानी समूहानं गुंतवणूकदारांमध्ये निर्माण केलेल्या विश्वासामुळचं हा सकारात्मक परिणाम झाल्याचं शेअर मार्केट तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाचं बाजारमूल्यं ६.५ लाख कोटी इतकं खाली आलं होतं, मात्र आता त्यात वाढ होऊन ते १०.६ लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक झालंय.