'विनोद तावडेंशी नियतीचा अजब खेळ'- अशोक चव्हाण
Max Maharashtra | 4 Oct 2019 7:10 PM IST
X
X
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी विनोद तावडे यांच्या 'त्या' सल्ल्याचा आपल्या ट्विटर हॅण्डल वरून समाचार घेतला आहे.
संबधित बातम्या:
- विनोद तावडे आता कसा देणार अशोक चव्हाणांना सल्ला?
- 'मी माझी चूक सुधारेन, पक्षाने आपली चूक सुधारावी'- विनोद तावडे
- शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा पत्ता अखेर कट, कोणाला मिळाली उमेदवारी वाचा
लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने उरलेली पत वाचवण्यासाठी अशोक चव्हाणांनी निवडणूक लढवू नये, असा सल्ला विनोद तावडे यांनी अशोक चव्हाणांना काही दिवसांपूर्वीच दिला होता.
मात्र, आता विनोद तावडे यांनाच भाजपची उमेदवारी न मिळाल्याने अशोक चव्हाणांनीही त्यांच्या सल्ल्याचे प्रतिउत्तर दिलं आहे.
https://twitter.com/AshokChavanINC/status/1180092346525831168
"मी निवडणूक लढवू नये, असा अनाहूत सल्ला देणार्या विनोद तावडेंना भाजपचं तिकिटही मिळू नये, हा नियतीचा अजब खेळ आहे. एक मित्र म्हणून मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे." असे ट्विट चव्हाण यांनी केलं आहे.
Updated : 4 Oct 2019 7:10 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire