धक्कादायक..! आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर साईल चा मृत्यू
कार्डेलिया क्रुझ प्रकरणातील पहिल्या क्रमांकाचा पंच प्रभाकर साईल याचे शुक्रवारी रात्री निधन झाले.
X
अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला कार्डेलिया क्रुझवर ड्रग्जप्रकरणी अटक केल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्या प्रकरणी एनसीबीने साक्ष घेतलेला पहिल्या क्रमांकाचा पंच प्रभाकर साईल याचे शुक्रवारी निधन झाले.
कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणात शाहरुख पुत्र आर्यनला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचा काल(शुक्रवार) मृत्यू झाला. त्यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल त्यांचे चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
एनसीबीचा पहिल्या क्रमांकाचा पंच प्रभाकर साईल याने या प्रकरणानंतर एका प्रसिध्द वृत्तवाहिनीला मुलाखत देत खळबळजनक दावे केले होते. त्यानंतर या प्रकरणात ट्वीस्ट आला होता. मात्र आता त्यानंतर प्रभाकर साईल याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रमुख पंच असलेल्या साईल चा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानेच झाला की घातपात आहे? अशी चर्चा लोकांमध्ये रंगली आहे.
प्रभाकर साईल याचे पार्थिव आज सकाळी ११ वाजता पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या घरी आणले जाईल. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रभाकर साईल चर्चेत का ?
कार्डेलिया क्रुझवर कारवाई केल्यानंतर आर्यन खान याला एनसीबीने अटक केली. या प्रकरणात पहिल्या क्रमांकाचा पंच असलेल्या प्रभाकर साईलची साक्ष नोंदवण्यात आली होती. मात्र त्यानंतर काही दिवसातच प्रभाकर साईलने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत संरक्षणासाठी मुंबई पोलिस आयुक्तांकडे धाव घेतली होती. तसेच प्रभाकर साईलने अनेक खळबळजनक आरोप केले होते. त्यामुळे प्रभाकर साईल चर्चेत आला होता. मात्र प्रभाकर साईलचा शुक्रवारी हृदयविकाराच्या
आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात ज्या क्रूझवरून अटक करण्यात आली होती, त्या क्रूझबाहेर आपण हजर होतो, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत संरक्षणासाठी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव देखील घेतली होती. त्यामुळे अचानक प्रभाकर साईलचा मृत्यू झाल्यामुळे शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. तसेच हा मृत्यू आहे की घातपात याबाबत चर्चा लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.