Aryan Khan case : एका सेल्फीमुळे डील फिस्कटली? साक्षीदाराचा गौप्यस्फोट
X
Aryan Khan प्रकरणात अजूनही वेगवेगळे दावे आणि आरोप केले जात आहेत. प्रभाकर साईल या पंचाने समीर वानखेडे, किरण गोसावी यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले. त्यानंतर आता या प्रकरणात सुनिल पाटील यांचे नाव समोर आले आहे. सुनिल पाटील ही व्यक्तीच आर्यन खान प्रकरणाची मुख्य सूत्रधार आहे, असा गंभीर आरोप भाजपचे मोहित कंबोज यांनी केल्यानंतर आता त्याला नवाब मलिक यांनी दुजोरा दिला, पण तो राष्ट्रवादीचा नव्हे तर भाजप नेत्यांच्या संपर्कातील व्यक्ती आहे, असा दावा केला.
पण आता याप्रकरणातील आणखी एक साक्षीदार पुढे आला आहे आणि त्यांनी आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यात आल्याचा दावा केला आहे, तसेच आर्यन खानला यातून बाहेर काढण्यासाठी शाहरुख खानची पीए पूजा दादलानी हिच्यासोबत त्यांनी डील केली होती, पण किरण गोसावीच्या एका सेल्फीमुळे डील फिक्सटल्याचा आरोप गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार विजय पगारे यांनी या प्रकरणामध्ये संशयित असलेले धुळ्यातील सुनील पाटील यांच्यासोबत आपण गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून होतो, असा दावा केला आहे. आर्यन खान प्रकरणी जी डील झाली होती, त्यासंदर्भातील सर्व बातचीत आपल्यासमोरच झाली होती, असा दावाही विजय पगारे यांनी केला आहे. आर्यन खान हा निर्दोष असून त्याला या प्रकरणामध्ये अडकवण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा विजय पगारे केला आहे.
ळ्याचे सुनील पाटील यांनीच किरण गोसावीची ओळख गुप्तहेर म्हणून करुन दिल्याचं विजय पगारे यांनी सांगितले आहे. इतकेच नाही तर सुनील पाटील, मनिष भानुशाली आणि किरण गोसावी यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावाही विजय पगारे यांनी केला.
आर्यन खान प्रकरणात मोठं रॅकेट काम करत होतं. आर्यन खानवरील कारवाई ही ठरवून केली गेली आहे. या प्रकरणात पूजा ददलानी, सॅम डिसोजा, केपी गोसावी, मनिष भानुशाली आणि मास्टर माईंड सुनील पाटील यांच्यात 100% टक्के डील झाली होती. सुनील पाटील सोबत असल्यामुळे या डीलबाबत आपल्याला माहिती मिळाली होती. सुनील पाटील हा हॉटेल ललितमध्ये राहत होता. किरण गोसावीच्या एका सेल्फीमुळे ही डील फिस्कटली, असा दावा विजय पगारे यांनी केला आहे.