Home > News Update > आर्यन खान प्रकरणात मोठा ट्विस्ट : कोटींची डील झाल्याचा दावा

आर्यन खान प्रकरणात मोठा ट्विस्ट : कोटींची डील झाल्याचा दावा

आर्यन खान प्रकरणात मोठा ट्विस्ट : कोटींची डील झाल्याचा दावा
X

गेले काही दिवस चर्चेचा विषय ठरलेले आर्यन खान प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणी आता किरण गोसावीच्या बॉडिगार्ड

प्रभाकर साईल यांनी व्हिडिओ आणि प्रतिज्ञापत्र जारी करत या प्रकरणात कोट्यावधीची डील झाल्याचा दावा केला आहे



अंमली पदार्थप्रकरणी क्रूझ पार्टीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर आरोपींना पकडण्यात आल्यानंतर आर्यन खानसोबतचा सेल्फी काढल्याने किरण गोसावी चर्चेत आला. आता किरण गोसावीच्या खासगी बॉडीगार्ड प्रभाकर साईल नं एका व्हिडिओद्वारे धक्कादायक माहिती दिली आहे.

क्रूझवरील छाप्यावेळी २ ऑक्टोबरला काय घडलं. त्यावेळी आपणही किरण गोसावीसोबत होतो, आसा दावाही त्याने केला आहे. प्रभाकर साईल हा अंमली पदार्थप्रकरणी क्रमांक १ चा साक्षीदार आहे.



नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे आणि किरण गोसावी यांनी मिळून कशाप्रकारे सर्वांना पकडलं याची माहिती बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने दिली आहे. क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात किरण गोसावी सुरवातीपासूनच वानखेडेंसोबत होता. तसंच कशा प्रकारे आर्यन खानसह इतरांना पकडण्यात आलं. याची सर्व माहिती त्याने दिली आहे.

प्रभाकर साईल म्हणाला, किरण गोसावी अहमदाबादवरून आल्यानंतर थेट मुंबई दाखल झाला. एनसीबीच्या कार्यालयातून ते क्रूझ ठिकाणी गेले. साडेदहा पावणे अकरा वाजता क्रूझमधील अनेकांना पकडण्यात आलं होतं. आर्यन खानही त्यात होता. त्याला वेगळं बसवण्यात आलं होतं. आणखी ७ ते ८ जण तिथे होते. मी यासर्वांचे आपल्या मोबाइलमध्ये गुपचूप फोटोही काढले. किरण गोसावी आर्यन खानला घेऊन एनसीबीच्या कार्यालयात गेले.



पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून आपली सही कोऱ्या कागदांवर घेतली गेली. नऊ ते दहा कागदांवर आपल्या सह्या घेतल्या गेल्या. आपल्याकडून आधार कार्ड मागितल्यावर. पण ओरिजनल आधारकार्ड नसल्याने समीर वानखेडेंनी त्यांचा नंबर दिला आणि आपण आधार कार्ड व्हॉट्सअॅप केलं. त्यावेळी रात्री अडीच पावणे तीन वाजता आम्ही एनसीबीच्या कार्यालयातून खाली उतरलो. त्यावेळी किरण गोसावीना सॅम नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला. एनसीबी ऑफिसपासून ५०० मीटर अंतरावर एका डाव्याबाजूला त्यांची मिटींग झाली. मिटींगमध्ये त्यांची काहीतरी डील झाली, असं त्यांनी सांगितलं.

लोअर परळच्या ब्रीज खाली पहाटे साडेतीन पावणे चारच्या सुमारात सॅम, किरण गोसावी आणि एसआरकेची मॅनेजर होती. त्या तिघांमध्ये मिटिंग झाली. यानंतर त्यानी कारमधूनच आपल्याला फोन केला '२५ कोटींचा बॉण्ड' करायला सांगितला. त्यातले ८ कोटी समीर वानखेडेंना द्यायचेत आणि १० आपल्याला वाटायचे आहेत, असं ते म्हणाले. पैशांसाठी आम्ही पहाटे साडेपाच वाजेपर्यंत मंत्रालयासमोर रस्त्यावर थांबलो. पण न मिळाल्याने आम्ही वाशीला घरी निघून आलो. यानंतर काही वेळाने लगेच किरण गोसावीनी आपल्याला महालक्ष्मी स्टेशनजवळ ताडदेवजवळ इंडियाना हॉटेलजवळ थांबायला सांगितलं. यानुसार आपल्याला एका कारमधून ५० लाख रुपये घेण्यास सांगितलं. ५१०२ असा या कारचा क्रमांक होता, असं साईल म्हणाला.

आपल्याला संध्याकाळी साडेचार वाजता गोसावींचा पुन्हा फोन आला. त्यांनी वाशी पुलाजवळ बोलावलं. त्यानंतर इनॉर्बिट मॉलजवळ बोलावलं. त्यांनी आपल्या कारमधील पैशाची पिशवी दिली. सॅम नावाच्या व्यक्तीला चर्चगेटला ती परत देण्यास सांगितलं. सॅमने पैसे मोजले तर ते ३८ लाख रुपयेच निघाले. यात ३८ लाख रुपये आहे, असं सॅमने सांगितलं. तर हे किरण गोसावींशी बोला. आपल्याला यातलं काही माहिती नाही. त्यांचं बोलणं झालं आणि किरण गोसावीनी बाकीचे पैसे दोन दिवसात देतो असं सांगितलं. यानंतर किरण गोसावीच्या पुण्यातील प्रकरणाचे व्हिडिओ आपण बघितले, असं दावा साईलने केला आहे.





एक व्हिडिओ जारी करून प्रभाकर साईल याने हा दावा केला आहे. सामीर वानखेडेंची आपल्याला भीती वाटतेय. कारण पत्नीला पोलिसांचे चौकशीसाठी फोन आले होते. तिने आपल्याला हे सांगितलं. यामुळे कुटुंबाला काही झालं, तर मी कुणासाठी जगायचं. म्हणून मी हा व्हिडिओ जारी केलाय. यामर्फत सर्वांना सत्य सांगण्याचा प्रयत्न करत आहे, असं प्रभाकर साईलने म्हटलं आहे.

फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावीच्या असिस्टंटला काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शेरबानो कुरेशी असं या महिला असिस्टंटचे नाव आहे. मलेशियात नोकरी लावतो म्हणून पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी तीन लाखांची फसवणूक केली होती. या प्रकरणी २०१८ मध्ये दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदारांपैकी एक फरार केपी गोसावीच्या सहकाऱ्याने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने त्यांना खोट्या पंचनाम्यावर सही करायला लावली होती, असा आरोप केपी गोसावीचा सहकारी प्रभाकर सेल यांने केला आहे. केपी गोसावी हा क्रूझवरील छापेमारी प्रकरणातील ९ साक्षीदारांपैकी एक आहे. केपी गोसावीचा आर्यन खानसोबत सेल्फी व्हायरल झाल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्याने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

प्रभाकर सेलने म्हटलंय की तो गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. ज्या रात्री क्रूझवर छापेमारी करण्यात आली त्या रात्री तो गोसावी सोबत होता. त्या छापेमारीनंतर पंचनामा म्हणून एनसीबीने कोऱ्या कागदावर सह्या करायला लावल्या, असं त्याने सांगितलं. दरम्यान, क्रूझवर झालेल्या जप्तीच्या कारवाईबद्दल माहिती नसल्याचाही दावा त्याने केलाय. त्याने सॅम आणि गोसावी नावाच्या व्यक्तीला एनसीबी कार्यालयाजवळ भेटताना पाहिल्याचंही म्हटलंय.

क्रूझवर छापेमारीच्या वेळी आपण काही व्हिडिओ आणि फोटो काढले होते, असंही प्रभाकरने सांगितलं. त्यापैकीच एका व्हिडिओमध्ये गोसावी आर्यन खानला फोनवर कोणाशी तरी बोलायला लावताना दिसत आहे. दरम्यान, प्रभाकर सेलने केलेल्या आरोपांनंतर या छापेमारी संदर्भात आणि एनसीबी अधिकाऱ्यांसह केपी गोसावीच्या भूमिकेबाबतीत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

समाजमाध्यमांवर प्रभाकर साईलचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यांसंधीचे प्रभाकर साईल यांनी केले प्रतिज्ञापत्रही समाजमाध्यमांवर फिरत आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यानंतर `सत्य ही जीतेगा सत्यमेव जयते` असं ट्विट केलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ जारी करत को-या पेपरावर अशा पध्दतीने सह्या करुन एनसीबी महाराष्ट्राला बदनाम करत असल्याचं म्हटलं आहे.

Updated : 24 Oct 2021 4:54 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top