Home > News Update > मोठी बातमी: आर्यन खान केसमधून समीर वानखेडेंना डच्चू!

मोठी बातमी: आर्यन खान केसमधून समीर वानखेडेंना डच्चू!

मोठी बातमी: आर्यन खान केसमधून समीर वानखेडेंना डच्चू!
X

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आज नवा ट्विस्ट समोर आला आहे. NCB ने या प्रकरणाचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून हा तपास काढून घेतला आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडेवर 8 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. वानखेडे यांना हटवल्यानंतर या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपानंतर वानखेडे मोठ्या वादात सापडले होते. विशेष म्हणजे आर्यन खान खटल्यातील एनसीबीचा साक्षीदार प्रभाकर सैल याने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळं त्यांच्या तपासावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

समीर वानखेडे यांना मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीतून काढून टाकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांची प्रतिक्रिया आली आहे. आर्यन खान प्रकरणासह 5 प्रकरणांमधून समीर वानखेडेला हटवण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे. एकूण २६ प्रकरणे आहेत ज्यांची चौकशी करणे आवश्यक आहे. ही फक्त सुरुवात आहे... ही व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल आणि आम्ही करू.

असं मलिक यांनी ट्वीट मध्ये म्हटलं आहे.




दरम्यान NCB ने NCB चे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली अंतर्गत तपासही सुरू केला. त्याच दरम्यान वानखेडे यांच्याकडून हा तपास काढून घेतल्याने वानखेडे यांना हा मोठा झटका समजला जात आहे.

दरम्यान समीर वानखेडे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

"मला तपासातून वगळण्यात आलेले नाही. या प्रकरणाचा तपास कोणत्या तरी केंद्रीय एजन्सीमार्फत व्हावा, अशी माझी न्यायालयात याचिका देखील केली होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीची एसआयटी करत आहे. दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी संघांमध्ये हा एक समन्वय आहे."

एकंदरीत या सगळ्या प्रकरणात आता दिल्ली एनसीबी टीम चौकशी करणार असल्याचं वानखेडे यांनी सांगितलं आहे.

Updated : 5 Nov 2021 9:13 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top