Home > News Update > अर्णब न्यायालयात काय म्हणाला?

अर्णब न्यायालयात काय म्हणाला?

अर्णब न्यायालयात काय म्हणाला?
X

अलिबाग येथील अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक केल्यानंतर पत्रकार व रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीशांसमोर गोस्वामी यांनी पोलिसांवर मारहाण केल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे न्यायालयाने गोस्वामी यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी आज (४ नोव्हेंबर) सकाळी पत्रकार अर्णब गोस्वामींना मुंबईतून अटक केली. त्यानंतर त्यांना सकाळी साडेअकराच्या सुमारास अलिबाग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दीड तास चौकशी केल्यानंतर गोस्वामी यांना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी अर्णब गोस्वामी याने न्यायाधीशांसमोर पोलिसांवर आरोप केले.

अलिबाग येथील अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण

पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचे सांगत, लोकशाहीचा गळा घोटला गेला आहे. मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोपही अर्णब गोस्वामी यांनी केले आहेत. पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करावी, असे आदेश दिले. तसेच त्याचा अहवाल आल्यानंतरच अर्णब गोस्वामींना पोलिस कोठडी द्यायची की नाही? याबाबतचा निर्णय दिला जाणार आहे.

Updated : 4 Nov 2020 5:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top