Home > News Update > अर्णब गोस्वामीला अटक, अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी कारवाई

अर्णब गोस्वामीला अटक, अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी कारवाई

अर्णब गोस्वामीला अटक, अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी कारवाई
X

रिपब्लिक टीव्हीचा मुख्य संपादक अर्णब गोस्वामी याला पोलिसांनी इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी अटक केली आहे. बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. अर्णब गोस्वामीला राहत्या घऱातून ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतल्यानंतर अर्णबला पोलिसांच्या व्हॅनमधून अलीबागला नेण्यात येणार आहे. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ही कारवाई केली आहे.

अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या पत्रात अर्णब गोस्वामी यांचं नाव होते.. पण अर्णब यांच्या रिपब्लिक टीव्हीने अक्षता नाईक यांचे सर्व आरोप याआधी फेटाळले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी होते, मग अन्वय नाईक यांच्या आत्महत्येची का नाही? असा सवाल अक्षता नाईक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला होता.

काय आहे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण?

कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद यांनी २०१८ मध्ये अलिबागमधील काविर गावातील त्यांच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी अन्वय यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळं आत्महत्या करत असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं होतं. त्यानंतर नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

दोन वर्षांनंतर , ५ मे रोजी नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी या प्रकरणी पुन्हा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी व्हिडिओद्वारे केली. एफआयआर दाखल केल्यानंतर दोन वर्षांत पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. तसंच माझ्या आणि मुलीच्या जीवाला धोका असून, आम्हाला काही झालं तर संबंधित व्यक्ती त्यास जबाबदार असतील, असंही त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. याअन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी केलेल्या मागणीची दखल राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी घेत योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्र्यांनी दिले होते.

Updated : 4 Nov 2020 9:45 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top