Home > News Update > अर्नबचा न्यायालयीन कोठडीतला मुक्काम वाढला

अर्नबचा न्यायालयीन कोठडीतला मुक्काम वाढला

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्नब गोस्वामींना आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. जामीनासाठी गोस्वामीच्या वकिलांना केलेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने इतर पक्षांची बाजू एकून घेतल्याशिवाय सुनावणी करता येणार नाही असं सांगितलं आहे.अर्णब गोस्वामी यांचा आजचा मुक्काम न्यायालयीन कोठडीतच असणार आहे.

अर्नबचा न्यायालयीन कोठडीतला मुक्काम वाढला
X

मुंबई उच्च न्यायालयात जामिनावरील सुनावणी टळली आहे. उद्या पुन्हा होणार न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामींचा कोठडीतला मुक्काम वाढला आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामीला अलिबाग न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर अर्णव गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. तर दुसरीकडे अलिबाग पोलिसांनी अर्णव गोस्वामींना पोलीस कोठडी मिळावी म्हणून सेशन कोर्टात धाव घेतली आहे. बाग न्यायालयातील जामीन अर्ज अर्णब यांच्या वकिलांनी मागे घेतला आहे. दोन ठिकाणी जामीन अर्ज दाखल केल्याने सुनावणीबाबत अडचण होण्याची शक्यता होती. त्यामुळे अलिबाग न्यायालयातील जामीन अर्ज मागे घेतला आहे.

दरम्यान, अर्णब गोस्वामींच्या मुंबई उच्च न्यायालयातील जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत टळली आहे. उद्या दुपारी पुन्हा जामिनावर सुनावणी होणार आहे. अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी काल अर्णव गोस्वामी यांना अटक केल्यानंतर त्यांना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा अलिबाग पोलिसांनी सत्र न्यायालयात धाव घेऊन अर्णव यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. त्यावर आज किंवा उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Updated : 5 Nov 2020 5:05 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top