Home > Max Political > महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का?,राजू शेट्टी यांचा राहुल गांधींना सवाल

महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का?,राजू शेट्टी यांचा राहुल गांधींना सवाल

काँग्रेसने 2015 साली विरोध केलेल्या शेतकरी विरोधी भुमिअधिग्रहण कायदा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने आणल्याने राजू शेट्टी यांचे राहुल गांधी यांना खरमरीत पत्र...

महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का?,राजू शेट्टी यांचा राहुल गांधींना  सवाल
X

2015 साली मोदी सरकारने आणलेल्या भुमिअधिग्रहण सुधारणा कायद्याला काँग्रेसने विरोध केला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने तोच कायदा महाराष्ट्रात लागू केला आहे. त्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का? असा सवाल राहुल गांधी यांना केला आहे.

महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर घटकपक्षांना सन्मानपुर्वक वागणूक देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र दोन वर्षानंतर अजूनही सन्मानपुर्वक वागणूक मिळत नसल्याने महाविकास आघाडीतील घटकपक्ष नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच 2013 साली काँग्रेसने बनवलेल्या भुमिअधिग्रहण कायद्यात 2015 साली मोदी सरकार सुधारणा करणार होते. त्यावेळी त्या दुरुस्त्यांना शेतकरी विरोधी असल्याचे सांगत काँग्रेसने जोरदार विरोध केला होता. मात्र महाराष्ट्रात भुमिअधिग्रहण कायद्यात दुरूस्ती करण्यात येत असल्याने स्वाभिानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खरमरीत पत्र लिहीले आहे.

राजू शेट्टी यांनी राहुल गांधी यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे की, काँग्रेसने बनवलेल्या भुमिअधिग्रहण कायद्यात 2015 साली मोदी सरकार शेतकरी विरोधी भुमिअधिग्रहण सुधारणा कायदा आणत होते. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह, मेधा पाटकर, उल्का महाजन आणि विविध शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला जंतरमंतर येथे येऊन पाठींबा दिला होता. मात्र तोच भुमि अधिग्रहण सुधारणा कायदा काँग्रेस पक्ष सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकरी विरोधी भुमिअधिग्रहण कायदा आणला आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेसची नीती आणि धोरणं बदलले आहेत का? की महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत? असा सवाल राजू शेट्टी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना केला आहे. याबाबत राजू शेट्टी यांनी ट्वीट केले आहे.

Updated : 17 Feb 2022 12:23 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top