दीड तास अर्नबने घातला पोलिसांशी वाद
X
पुछता है भारत! असं ओरडत राष्ट्रवादी पत्रकारिता करत असल्याचा दावा करणाऱ्या अर्णव गोस्वामी यांची अखेर आज रायगड पोलिसांनी नाकेबंदी केली. पहाटे पाच वाजता पोहोचलेल्या पोलिसांशी अर्णवने दिडतास हुज्जत घातली. व्हिडिओ आणि वकिलांशी चर्चेचं करत पोलिसांना टाळणाऱ्या अर्णव ची अखेर पोलिसांनी उचलबांगडी करून अलिबागला रवानगी केली. गेली काही म्हणे आक्रस्ताळी पत्रकारिता करून अजेंडा राबवणाऱ्या अर्नब गोस्वामी यांची आज अखेर रायगड पोलिसांनी नाकेबंदी केली.
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज सकाळी पनवेल पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांच्या थेट घरात घुसून त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी अर्णब यांच्या घरात दीड ता हुज्जत घातली. यादरम्यान पोलिसांनी सासू-सासरे, मुलगा आणि पत्नीला धक्काबुकी केल्याचा आरोपी अर्णब गोस्वामी यांनी केला आहे. रायगड पुणे शाखेचे टीम पहाटे पाच वाजता अर्णव गोस्वामी राहत असलेल्या वरळी परिसरात पोहोचली होती. अर्णव ने बराच वेळ दरवाजाच उघडला नव्हता. त्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर अर्नबच्या पत्नीने व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला. अर्णव रिपब्लिकन कार्यालयात फोन करूनही रिपोर्टर बोलवून घेतले. त्यानंतर वकिलांशी फोनवरून चर्चा करून अटक लांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शांतपणे दीड तास अर्णवला समजवण्याचा प्रयत्न केला. अलिबाग येथे गुन्हा दाखल झाला असून चौकशीसाठी असलेल्या अटक वारंट ही दाखवण्यात आले.
गोस्वामी गेले काही महिने सातत्याने मुंबई पोलिसांविरोधात गरळ ओकत होता. टिआरपी घोटाळ्यात रिपब्लिक चे नाव आल्यानंतर सर्व लक्ष केंद्रित झाले होते. मार्चमध्ये संपलेल्या अर्थसंकल्पी अधिवेशन मध्ये शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तरांमध्ये चौकशी करून कारवाई केली जाईल अशी घोषणा केली होती. रायगड गुन्हे शाखेची आज मोठी कारवाई करुन अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांकडून अर्णबना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या टीमने अर्णब यांना मुंबईतून घेतले ताब्यात घेतले.अटक करून अर्णबना अलिबागला देण्यात आले आहे.
आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा मोबाईल फोन देखील पोलिसांना जप्त केला आहे. आयपीसी कलम ३०६ अंतर्गत अर्णब गोस्वीमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.