Home > News Update > 'एप्रिल फूल डे' चे औचित्य साधून मोदींच्या फसव्या आश्वासनांचा केक कापून आंदोलन...

'एप्रिल फूल डे' चे औचित्य साधून मोदींच्या फसव्या आश्वासनांचा केक कापून आंदोलन...

एप्रिल फूल डे चे औचित्य साधून मोदींच्या फसव्या आश्वासनांचा केक कापून आंदोलन...
X

सतत वाढणारी महागाई... इंधन दरवाढ... वाढती बेरोजगारी... अच्छे दिनाच्या नावाखाली जनतेला आलेले बुरे दिन यामुळे जनतेची मोठी फसवणूक झाली आहे. याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने 'एप्रिल फूल डे' चे औचित्य साधून पंतप्रधान मोदींच्या खोट्या आश्वासनांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आजचा दिवस जगभरात 'एप्रिल फूल डे' म्हणून ओळखला जातो. एकमेकांची फसवणूक करून मजेत हा दिवस साजरा केला जातो. पण भारतात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून जनतेचीच मोठी फसवणूक झाली आहे.

केंद्रसरकार ज्या ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याच मुंबईतील ईडी कार्यालयासमोर असलेल्या पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हे अनोखे आंदोलन केले. मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मोदींच्या फसव्या आश्वासनांचा केक कापण्यात आला.

यावेळी प्रदेश युवक अध्यक्ष महेबुब शेख, उपाध्यक्ष अमोल मातेले, नवी मुंबई युवक जिल्हाध्यक्ष अन्नू आंग्रे, मोहसीन शेख, वीरू वाघमारे, गौतम आगा, सुनील पालवे, नाजीर शेख तसेच अन्य युवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Updated : 1 April 2022 7:07 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top