Home > News Update > कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करा ; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करा ; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करा ; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
X

नवी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना समान काम समान वेतन लागू करावे यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाले आहे. आज मनपा उपायुक्तांसोबत याबाबत झालेल्या बैठकीत कुठलाही ठोस निर्णय न झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन चव्हाण यांनी थेट उपायुक्तांचीच खुर्ची उचलून घेऊन जात आंदोलन केले.

उपायुक्तांच्या खुर्चीला मनपा मुख्यालयाच्या लॉबीमध्ये ठेवत त्याठिकाणी कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी मनपा प्रशासनाकडून लवकरच कंत्राटी कामगारांचा समान काम समान वेतन संदर्भातील प्रस्ताव सादर करून कामगारांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन दिल्यावर हे ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.

दरम्यान यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन चव्हाण म्हणाले की , आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आंदोलन करण्याचा अजिबात उद्देश नव्हता मात्र मनपाच्या अनागोंदी कारभारामुळे कामगारांचे नुकसान होत असल्याने आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली, कामगारांच्या या महत्वाच्या विषयाबाबत आम्ही राज्य शासनाकडे पाठपुरावा केला तेंव्हा राज्य शासनाकडून हा विषय स्थानिक पातळीवरील असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान मनपा प्रशासनाकडून गेल्यावेळी चुकीचा प्रस्ताव देण्यात आल्याने यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सलग तीन महिने संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करत योग्य प्रस्ताव देण्यासाठी वेळोवेळी बैठका घेतल्या मात्र तब्बल तीन तास बैठक होऊन देखील कामगारांचा प्रस्ताव सादर होत नसल्याने आम्हाला नाविलाज म्हणून आंदोलन करावे लागले. दरम्यान जोपर्यंत कामगारांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पाठपुरावा सुरूच ठेवेल अस यावेळी चव्हाण यांनी सांगितले.

Updated : 7 Sept 2021 8:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top