Home > News Update > वृत्तपत्र विक्रेता ते भारताचे राष्ट्रपती आणि मिसाईलमॅन...

वृत्तपत्र विक्रेता ते भारताचे राष्ट्रपती आणि मिसाईलमॅन...

वृत्तपत्र विक्रेता ते भारताचे राष्ट्रपती आणि मिसाईलमॅन...
X

एक सामान्य माणूस त्याच्या स्वप्नांच्या उत्कटतेने आणि मेहनतीने कसा महान बनू शकतो. याचं जीवंत उदाहरण म्हणजे मिसाइलमॅन डॉ.एपीजे अब्दुल कलाम. डॉ कलाम भारताचे 11 वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरमच्या धनुष्कोडी गावात एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला.

कलाम यांचे बालपण...

आईचे नाव आशियम्मा होते, त्या गृहिणी होत्या. वडिलांचे नाव जैनुलअब्दीन होते. त्यांचे वडील बोट भाड्याने द्यायचे तसेच बोट विक्रीचे काम करायचे. अब्दुल कलाम हे त्यांची एक बहीण आणि चार भावांमध्ये सर्वात लहान होते. कलाम यांचे वडील सुशिक्षित नव्हते. मात्र, त्यांचे विचार सामान्य विचारसरणीपेक्षा खूप उच्च होते. त्यामुळेच, ते स्वतः अशिक्षित असूनही त्यांना आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्यायचे होते.




कलाम यांचं बालपण आर्थिक विवंचनेत गेलं. कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी वर्तमानपत्र विकण्याचं कामही त्यांनी केलं. कलाम यांचं प्रारंभिक शिक्षण श्वार्ज उच्च माध्यमिक विद्यालय, रामनाथपुरम येथून पूर्ण झालं. त्यांच्यावर शिक्षक अय्यादुराई सोलोमन यांचा प्रभाव होता. त्यां

च्या शिक्षकाने त्यांना यशाचे 3 मूलभूत मंत्र सांगितले. इच्छा, आशा आणि विश्वास. हे तीन मंत्र होते, ज्याच्या मदतीने अब्दुल कलाम यांनी न केवळ उंच भरारी घेतली नाही तर, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यावर कायम राहिले. ऍडमिशनसाठी 1000 रुपये नव्हते, म्हणून बहिणीने दागिने गहाण ठेवले.

त्यांच्या शिक्षकाचा असा विश्वास होता की, यशासाठी या तीन शक्तींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉ. कलाम यांनी तिरुचिरापल्लीच्या सेंट जोसेफ कॉलेजमधून पदवी (बीएससी) प्राप्त केली. पदवी घेतल्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एरोनॉटिकल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली आणि मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु, प्रवेशासाठी 1000 रुपये आवश्यक होते. जी त्यावेळी खूप मोठी रक्कम होती. यासाठी त्यांची मोठी बहीण जोहराने तिचे दागिने गहाण ठेवले होते.. त्या दिवशी कलाम यांनी तिला वचन दिले की ते त्यांच्या मेहनतीच्या बळावर आपल्या बहिणीचे दागिने परत घेतील.





3 दिवसात बनवायचे रॉकेट तब्बल 24 तासात बनवले.

एरोनॉटिकल इंजिनीअरिंगचा 3 वर्षांचा कोर्स केल्यानंतर त्यांनी एका प्रोजेक्टवर काम सुरू केलं. त्याच्या प्रोजेक्ट इंचार्जने त्यांना 3 दिवसात रॉकेटचे मॉडेल पूर्ण करून देण्यास सांगितले होते. सोबत असे देखील म्हटले होते की, जर हा प्रकल्प वेळेवर पूर्ण झाला नाही तर शिष्यवृत्ती रद्द केली जाईल.

मग काय तर, त्यांच्या आयुष्यात अशा अनेक संधी आल्या ज्या खूप आव्हानात्मक होत्या. त्यामुळे, हे आव्हान त्याच्या जुन्या आव्हानासमोर फार मोठं नव्हतं पण ते सोपंही नव्हतं. कलाम यांनी आव्हान स्वीकारलं. मग भूक काय आणि तहान काय... काय झोपावे आणि काय उठावे. त्यांनी 3 दिवसांच काम फक्त 24 तासात पूर्ण केलं होतं. आणि रॉकेटच मॉडेल तयार झालं.





दरम्यान, जेव्हा त्यांच्या प्रोजेक्ट प्रेसिडेंटला या मॉडेलबद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी प्रत्यक्ष रॉकेट पाहिलं, तेव्हा ते आश्चर्यचकित होते की, असे रॉकेट अवघ्या 24 तासात कसे तयार होऊ शकते? त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.

DRDO मध्ये पहिली नोकरी...

एरोनॉटिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर कलाम यांनी हवाई दल आणि संरक्षण मंत्रालयाकडे अर्ज केला. दिल्लीत संरक्षण मंत्रालयात त्यांची मुलाखत चांगली झाली. त्यानंतर ते हवाई दलाच्या मुलाखतीसाठी देहराडूनला गेले, जिथे त्यांना 25 उमेदवारांपैकी 9 वा क्रमांक मिळाला, मात्र, तिथे फक्त 8 उमेदवारांची गरज होती. अशा प्रकारे कलाम पुन्हा दिल्लीला आले. जिथे त्यांची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) मध्ये वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक पदावर दरमहा 250 रुपये पगारावर नियुक्ती झाली.

डॉ. कलाम यांची वैज्ञानिक कामगिरी

1962 मध्ये, कलाम स्पेस रिसर्च इन्स्टिट्यूट (ISRO) मध्ये प्रकल्प संचालक म्हणून सामील झाले, त्यांनी भारताचा पहिला स्वदेशी उपग्रह SLV-III लाँच केला. जे जगातील विकसनशील देश म्हणून भारतासाठी मोठं यश होतं.





भारत 1980 मध्ये इंटरनॅशनल स्पेस क्लबचा सदस्य झाला. कलाम यांच्या टीमने रोहिणी उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे प्रक्षेपित केला. कलाम यांनी भारतासाठी अग्नी, त्रिशूल आणि पृथ्वी सारखी क्षेपणास्त्रे बनवली त्यानंतर भारताचा मिसाईल मॅन म्हणून त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळवली.

1998 मध्ये कलाम यांनी पोखरणमध्ये यशस्वी अणुचाचणी करून भारताला अणुशक्ती असलेला देश बनवले.

डॉ. कलाम यांचं राष्ट्रपती पद

कलाम हे राष्ट्रपती होण्यापूर्वी 1992 ते 1999 पर्यंत पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार आणि DRDO चे सचिव होते. भाजपच्या कार्यकाळात डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार बनवण्यात आले. त्यांचा 90% पेक्षा जास्त मतांनी विजयी झाला. त्यांनी 25 जुलै 2002 रोजी पदाची शपथ घेतली आणि 25 जुलै 2007 रोजी त्यांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला. डॉ.एपीजे अब्दुल कलाम हे पहिले राष्ट्रपती होते. ज्यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती.

पुस्तके आणि उपलब्धी...

इंडिया 2020, इगनाइटेड माइंड्स, मिशन इंडिया, द लुमिनस स्पार्क इंस्पायरिंग थॉट्स ही डॉ. कलाम यांनी लिहिलेली जगातील सर्वात लोकप्रिय पुस्तक आहेत. त्यांनी देशातून भ्रष्टाचार घालवण्यासाठी, What can I give? नावाने तरुणांसाठी एक मिशन सुरू केले?

दरम्यान, त्यांना मुलांशी आणि विद्यार्थ्यांशी विशेष आकर्षण होते, म्हणून 15 ऑक्टोबर रोजी त्यांचा वाढदिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. याव्यतिरिक्त, त्यांनी भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेचे कुलपती म्हणून देखील काम केले आहे.

यासोबतच, जेजेएस यूनिवर्सिटी म्हैसूर, एयरोस्पेस इंजीनियरिंग, अन्ना यूनिवर्सिटी चेन्नई, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ़ मैनेजमेंट अहमदाबाद आणि इंदूरमध्ये अतिथी प्राध्यापक म्हणून देखील काम केले आहे. डॉ. कलाम यांना भारत आणि परदेशातील 40 हून अधिक विद्यापीठे आणि संस्थांनी मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे.





याशिवाय त्यांना 1981 मध्ये पद्मभूषण आणि 1990 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना 1997 मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला. भारतरत्न म्हणजे देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान. दरम्यान, डॉ.कलाम यांचे आत्मचरित्र विंग्स ऑफ फायर प्रथम इंग्रजीमध्ये आणि नंतर 13 भाषांमध्ये प्रकाशित झाले.

डॉ.कलाम यांच्या टीमने भारताचं पाहिलं रॉकेट SLV-3 बनवलं. पोखरणने दुसरी यशस्वी आण्विक चाचणी घेतली. तसेच, त्यांनी डीआरडीओ आणि इस्रोचे नेतृत्वही केले आहे. यासोबतच, भारताला अग्नी पृथ्वी आणि त्रिशूल सारखी क्षेपणास्त्रे दिली.

कलाम यांची धर्मनिरपेक्षता

डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे धर्मनिरपेक्ष व्यक्ती होते. त्यांनी सर्व धर्मांचा समान आदर केला. एकेकाळी वर्तमानपत्राचे कटिंग सोशल मीडियावर शेअर केले जात होते. कटिंगमध्ये असे लिहिले होते की, कुराणात लिहिलेल्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने मांडून मदरसे धार्मिक असहिष्णुता वाढवत आहेत. त्यामुळे, त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे.

मात्र, डॉ. कलाम यांच्या कुटुंबाशी संपर्क साधल्यावर असं आढळून आलं की, ते सर्व धर्मांचा समान आदर करतात. त्यांनी कधीही कोणत्याही धर्माच्या रूढीवादी गोष्टी स्वीकारल्या नाहीत.

कलाम यांचं निधन म्हणजे एका युगाचा अंत

आयआयटी गुवाहाटी शिलाँग येथे व्याख्यान देताना 27 जुलै 2015 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशातच नव्हे तर संपूर्ण जगात शोककळा पसरली. सलग दोन दिवस त्यांच्या निधनाच्या बातम्या येत राहिल्या. अनेक वृत्तपत्रांमध्ये, संपूर्ण पान त्याच्या आठवणींनी भरलेले होते. विशेषतः त्याच्या शब्दांना वर्तमानपत्राच्या पानांवर प्रमुख स्थान देण्यात आले.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची काही प्रसिद्ध वाक्य...

१) खुश रहने का बस एक ही मंत्र है, उम्मीद बस खुद से रखो, किसी और इंसान से नहीं।

२) सपने वो नहीं है जो आप नींद में देखें, सपने वो हैं जो आपको नींद ही नहीं आने दे.

३) केवल ताकत ही ताकत का सम्मान करती है।

४) इंतजार करने वाले को उतना ही मिलता हैं, जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं।

Updated : 15 Oct 2021 8:51 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top