Home > News Update > लाच घेताना रंगेहाथ पकडलेला API फरार, 1 हवालदार ताब्यात

लाच घेताना रंगेहाथ पकडलेला API फरार, 1 हवालदार ताब्यात

मुंबई पोलिसांवर झालेल्या आऱोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असताना आता सांगली जिल्ह्यातील विटामध्ये सिनेमासारखा थरारक प्रकार प्रत्यक्षात घडला आहे.

लाच घेताना रंगेहाथ पकडलेला API फरार, 1 हवालदार ताब्यात
X

सांगली जिल्ह्यातील विटामध्ये सहाय्याक पोलीस निरीक्षक आणि दोन हवालदारांना 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. विटा पोलिस ठाण्याचे एपीआय प्रदीप झालटे यांच्यासह दोन हवालदार एक लाखाची लाच घेताना सापडले आहेत. या लाचखोर पोलिसांना पकडताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचा-यांशी हवालदार विवेक यादव आणि अकीब तांबोळी या पोलिसांनी झटापट केली तर एपीआय झालटे फरार झाले आहेत.

ज्या व्यक्तीने तक्रार केली आहे, त्यांच्या मालकाच्या विरूध्द आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहहे. या गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्यासाठी एपीआय प्रदीप झालटे आणि कॉन्सेटबल विवेक यादव, अकीब तांबोळी यांनी दिड लाखांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर ACBने सापळा लावून हवालदार विवेक यादव, अकीब तांबोळी यांना एक लाखाची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. तर एपीआय झालटे फरार आहेत. प्रदीप झालटे, हवालदार विवेक यादव आणि अकीब तांबळी यांच्या विरोधात विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी सुजय घाटगे यांनी दिली.

Updated : 27 March 2021 8:55 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top