Home > Election 2020 > लोकांची गर्दीच नसल्यानं सभा रद्द केली – अनुपम खेर

लोकांची गर्दीच नसल्यानं सभा रद्द केली – अनुपम खेर

लोकांची गर्दीच नसल्यानं सभा रद्द केली – अनुपम खेर
X

हरयाणा मधील चंडीगढ लोकसभा मतदारसंघातून सध्या भाजपच्या विद्यमान खासदार किरण खेर या निवडणूक लढवत आहेत. पत्नी किरण यांच्या प्रचारासाठी पती अनुपम खेर हे निवडणुकीचा प्रचार करत आहेत. अनुपम खेर यांच्या काही प्रचारसभांना लोकच उपस्थित नव्हती. त्यामुळं काही सभाच रद्द कराव्या लागल्या, अशी स्पष्ट कबुलीच अनुपम खेर यांनी दिली.

अनुपम खेर यांनी पत्नीसाठी चंडीगढीमध्ये वेगवेगळ्या प्रचार सभांचं नियोजन केलं होतं. त्यातल्या पहिल्या दोन सभा या ५ मे ला होत्या. यातली पहिली सभा सेक्टर २८ सी इथं दुपारी चार वाजण्याच्या सुमारास होती. मात्र, या सभेसंदर्भात कुणालाच माहिती नसल्यानं अगदी शेवटच्या क्षणी ही सभा रद्द करावी लागली. कारण या सभेला कुणीच उपस्थित नव्हतं, अशी माहिती पहिल्या सभेच्या संयोजकांपैकी एक मन्नु भसीन यांनी सांगितलं. तर दुसरी सभा ही सेक्टर ३५ मध्ये होती. त्यानंतर सेक्टर ३५ मध्येही अनुपम खेर यांच्या नियोजित सभेला गर्दीच नव्हती. त्यामुळं दुसरी सभाही रद्द करावी लागली. अनुपम खेर यांनी स्वतःच ट्विट करून सभांना गर्दी नसल्यानं सभा रद्द कराव्या लागल्याची माहिती दिली. मात्र, त्यानंतरच्य सभांना प्रतिसाद मिळाल्याचंही अनुपम खेर यांनी म्हटलंय. दरम्यान, सातव्या टप्प्यात चंडीगढ इथं मतदान होतंय.

प्रचारात अनुपम खेर यांच्या अडचणीत वाढ

पहिल्या दोन सभांना मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादामुळं सभाच रद्द करण्याची नामुष्की ओढावलेल्या अनुपम खेर यांना त्यानंतरच्या प्रचारातही वाईट अनुभव येत आहेत. प्रचारा दरम्यान एका दुकानदारानं अनुपम खेर यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतला जाहीरनामा दाखवत यातली किती आश्वासन पूर्ण केली, असा प्रश्न विचारला. मात्र, निःशब्द झालेल्या अनुपम खेर यांनी दुकानदाराच्या प्रश्नाला उत्तरं न देता तिथून काढता पाय घेतलाय.

<

/h6>

Updated : 8 May 2019 7:38 PM IST
Next Story
Share it
Top