तामिळनाडूच्या राजकारणात आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री; थलापती विजयने केली नव्या पक्षाची घोषणा
X
मागे एका कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेते अशोक सराफ यांच्या करिअरचं ,कार्याचं कौतुक करताना एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की अशोक सराफ जर तामिळनाडू मध्ये जन्मले असते तर ते कदाचित तामिळनाडूचे मुख्यमंत्री राहिले असते.
त्यांनी हे वक्तव्य केलं होतं त्याला कारण तामिळनाडूच्या राजकारणात फिल्म इंडस्ट्री मधल्या कलाकारांचा खुप मोठा प्रभाव राहीला आहे. त्यात आणखीन एक तमिळ सुपरस्टार थलापती विजय ने सुद्धा राजकारणात एंट्री केली आहे . त्याने आज स्वतःच्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. तमिळगा वेट्री कळगम असे त्याच्या नव्या पक्षाचं नाव आहे .विजय ने अनेक तमिळ सिनेमात काम केलं आहे. अनेक सिनेमे सुपरहीट झाले आहेत. तामिळनाडू मध्ये विजयचा मोठा चाहता वर्ग आहे.
पण फक्त विजयच नाही अनेक तामिळ चित्रपट कलाकार आणि निर्माते राजकारणात सक्रिय आहेत. ते विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढतात आणि मंत्रीपदही मिळवतात.
एम.जी. रामचंद्रन (एमजीआर) हे याचे उत्तम उदाहरण आहेत. ते एक लोकप्रिय अभिनेते होते त्यांनी अनेक शेकडो शेकडो सिनेमा मध्ये काम केलं तामिळनाडू मध्ये त्यांचा खुप मोठा चाहता वर्ग होता. पुढे जावून त्यांनी द्रमुक पक्ष स्थापन केला आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले.
जयललिता हे आणखी एक उदाहरण आहेत. त्या एका यशस्वी अभिनेत्री होत्यात्यांनी अनेक तमिळ आणि हिन्दी सिनेमात काम केलं परत एमजीर यांच्या निधनानंतर त्यांनी अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्षाचे नेतृत्व केले आणि मुख्यमंत्री बनल्या.
सध्याचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन हे द्रमुक पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या वडिलांनीही (एम. करुणानिधी) मुख्यमंत्रीपद भूषवले होते. कुरूननिधी हे तमिळ फिल्म इंडस्ट्री मध्ये खुप मोठे लेखक होते.
त्यानंतर रजनीकांत, कमल हसन यांनी सुद्धा राजकारणात हात मारण्याचा पर्यटन केला पण त्यात ते अपयशी ठरले.
पण अशी कोणती कारणं आहेत की तमिळ जनता तेथील कलाकारांना इतकी डोक्यावर घेते.
1)तामिळ सिनेमे तामिळ संस्कृती आणि समाजावर मोठा प्रभाव टाकतात.
2 )ते सामाजिक आणि राजकीय मुद्दे उपस्थित करतात आणि लोकांच्या मतांवर आणि मनावर प्रभाव टाकतात .
3)सिनेमातून दिलेले संदेश प्रेक्षकांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये, सामाजिक बदल घडवून आणणारे असतात.
उदाहरणार्थ, स्त्रियांच्या सक्षमीकरणाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी अनेक तामिळ चित्रपट बनवले गेले आहेत.
आता थलापती विजय राजकारणात कितपत यश मिळवतो हे पाहणं उत्सुकत्याचं ठरणार आहे.