Home > News Update > शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अण्णांचा पाठिंबा, दिल्लीत करणार आंदोलन

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अण्णांचा पाठिंबा, दिल्लीत करणार आंदोलन

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अण्णा हजारेंनी शेवटच्या आंदोलनाचा इशारा देत दिल्लीत आंदोलनासाठी सरकारकडे जागेची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अण्णांचा पाठिंबा, दिल्लीत करणार आंदोलन
X

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे, तसंच अण्णा हजारेंनी त्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णयदेखील घेतला आहे. त्यासाठी अण्णा हजारेंनी सरकारला रामलीला मैदान किंवा जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितली आहे.

केंद्र सरकारने केलेले तिन्ही कृषी कायदे तत्काळ रद्द करावे या मागणीसाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांनी आंदोलने सुरू केली आहे. तर अण्णा हजारे यांनी देखील दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी व्हावे अशी मागणी दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने अण्णांची भेट घेऊन केली आहे.

"शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मी अनेकवेळा आंदोलने केली. स्वःत पंतप्रधानांना पत्र लिहिलं तरी देखील मागण्यांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकरी हितासाठी एक शेवटचं आंदोलन मी करणार आहे. आंदोलन करणार असल्याचे पत्र मी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पाठवल आहे. मात्र आता आंदोलनाची जागा निश्चित करण्यासाठी सरकारला पत्र लिहिलं असून रामलीला मैदान किंवा जंतरमंतरवर आंदोलनाची परवानगी मागितली आहे." असे अण्णा हजारेंनी सांगितले आहे.

Updated : 22 Dec 2020 2:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top