Home > News Update > अनिल देशमुखांच्या ED (ईडी) चौकशीचा फैसला खंडपीठ ठरवणार?

अनिल देशमुखांच्या ED (ईडी) चौकशीचा फैसला खंडपीठ ठरवणार?

अनिल देशमुखांच्या ED (ईडी) चौकशीचा फैसला खंडपीठ ठरवणार?
X

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे लागलेले ED चौकशीचे भवितव्य मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ ठरवणार आहे. एका न्यायुमर्तीपुढे सुनावणी व्हावी की खंडपीठापुढे याचा निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. संदिप शिंदे यांनी दिला.

सचिन वाझे प्रकरणानंतर 4.7 कोटी हप्तावसुलीचा कथित आरोपावरुन ED कडून देशमुख यांना पाचवेळा समन्स पाठवले आहे. तब्बेतीचे कारण देत देशमुख यांनी आतापर्यंत चौकशी टाळली आहे. दुसऱ्या बाजूला त्यांनी सर्वाच्च न्यायालय आणि आता उच्च न्यायालयात ED ने दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी एक न्यायाधीशापुढे व्हावी कि खंडपीठापुढे यावरुन उच्च न्यायालयाने सुनावणी घेतली होती. आज त्यावर निर्णय देत न्या. संदिप शिंदे यांनी खंडपीठापुढे सुनावणी होईल असे स्पष्ट केलं.

अनिल देशमुख यांच्या वकिलांची एकाच न्यायमुर्ती पीठाकडे सुनावणी योग्य असल्याचे सांगितले. तर ईडीच्या वकिलांनी खंडपीठाने सुनावणी करावी अशी मागणी केली होती. हा कोर्टाच्या रजिस्ट्रीने याबाबत आक्षेप घेतला होता. त्यानंतर सुनावणी पार पडली. न्या. शिंदे यांनी एआयआर रद्द करण्याच्या मागणीच्या याचिकेची सुनावणी खंडपीठापुढे होणे योग्य असल्याचे सांगितले.

Updated : 14 Sept 2021 3:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top