#Lockdownyatra : बेरोजगारीमुळे तरुण बनला 'गोल्डमॅन' !
टीम मॅक्स महाराष्ट्र | 10 Jan 2022 12:45 PM IST
X
X
कोरोनाच्या संकट काळात गेल्या दोन वर्षात अनेकांचा रोजगार गेला आहे. तर अनेकांना अजूनही काम मिळत नाहीये. धारावीमध्ये राहणाऱ्या मोहम्मद तोफीक या तरुणाच्या बाबतीतही हा प्रकार घडला आहे. त्यामुळे पोटापाण्याचा रोजचा प्रश्न सोडवण्यासाठी हा गर्दीच्या ठिकाणी गोल्डमॅन म्हणून पुतळ्यासारखा उभा राहतो आहे. यातून लोकांनी त्याला पैसे दिले की त्याचा दिवसभराचा प्रश्न सुटतो आहे. चांगली नोकरी मिळेपर्यंत पोटासाठी काहीतरी पर्याय हवा असे त्याचे म्हणणे आहे. मुंबईच्या आझाद मैदानाला लागून असलेल्या मैदानात पुतळ्यासारखा उभा राहून तो नागरिकांचे मनोरंजन करत आहे. या गोल्डमॅनला बघायला नागरिकही गर्दी करत आहेत.
Updated : 10 Jan 2022 7:03 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire