Home > News Update > आजपासून अमूल दूध 2 रुपयांनी महागणार, बाकी दूधाचे दर वाढणार का?

आजपासून अमूल दूध 2 रुपयांनी महागणार, बाकी दूधाचे दर वाढणार का?

दुध उत्पादनामध्ये देशभर गाजलेले नाव असलेल्या अमुलने दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर 1 मार्चपासून अमूलचे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे आजपासून अमूलचे दुध 2 रुपयांनी महागणार आहे. मात्र अमूल दुधापाठोपाठ इतर दुधाचे दर वाढणार का? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.

आजपासून अमूल दूध 2 रुपयांनी महागणार, बाकी दूधाचे दर वाढणार का?
X

देशातील नामांकित दुध आणि दुग्धजन्य पदार्थांशी संबंधीत असलेली कंपनी अमूलने दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर अशा प्रकारे अमूल कंपनीकडून अचानक दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला जात नाही. मात्र यावेळी अमूलने दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर हे नवे जर आजपासून लागू होणार आहेत. मात्र अमूल दूधाने आपल्या दरात वाढ केल्यामुळे इतर कंपन्याही दुधाच्या दरात वाढ करतील का? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. कारण अमूल दुध देशातील अनेक राज्यात विकलं जात आहे. त्याच प्रमाणे देशात इतर कंपन्या आहेत त्या वेगवेगळ्या राज्यात सक्रीय आहेत. त्या कंपन्या देखील आता त्यांच्या दूधाच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे.

ज्यामध्ये मदर डेयरी (दिल्ली), वीटा (हरियाणा), मपराग (यूपी), वेरका (पंजाब), सुधा (बिहार) याच्याशिवाय पारस, आनंद, मोहन या कंपन्यांचा समावेश आहे. तसंच या कंपन्यांनी देखील दूधाच्या दरात वेळोवेळी वाढ केली आहे. तर अमूल ने दरवाढीसंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. दोन वर्षापासून अमूल ने त्यांच्या दरामध्ये वाढ केली नव्हती. त्यामुळे अमूल आपल्या दरात ४ टक्क्यांनी वाढ केली आहे.

नवीन दर लागू झाल्यानंतर अमूल गोल्ड च्या अर्ध्या लिटर दूधासाठी 30 रुपये, अमूल ताजाच्या अर्धा लिटर दुधासाठी 27 रुपये, अमूल शक्ति च्या अर्धा लिटर दूधासाठी 24 रुपये मोजावे लागणार आहेत.

अमूल ने यांचे कारण पॅकेजिंग, वाहतुकीचा खर्च आणि जनावरांचा चाऱ्याचा खर्च वाढला आहे. अमूल एक दूध सहकारी संस्था आहे. ज्यांची सुरूवात गुजरातमधून झाली. अमूल शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करते. …आणि त्याला अमुल नावाने विकते. डिसेंबर 2021 ला आंध्रप्रदेश चे मुख्यमंत्री कृष्णा जिल्ह्यात नवीन योजनेची घोषणा केली होती. दरम्यान दूध दरवाढ झाल्याने लोकांनी सोशल मीडियावर सरकारवर टीका केली आहे.

Updated : 1 March 2022 9:12 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top