25 ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण
सरकारनं २४ ऑक्टोबरपर्यंत निर्णय दिला नाही, तरी २५ ऑक्टोबरपासून पुन्हा आमरन उपोषण सुरू करण्याचा इशारा अंतरवाली सराटी च्या एका कार्यक्रमातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
X
सरकारनं २४ ऑक्टोबरपर्यंत निर्णय दिला नाही, तरी २५ ऑक्टोबरपासून पुन्हा आमरन उपोषण सुरू करण्याचा इशारा अंतरवाली सराटी च्या एका कार्यक्रमातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
दरम्याने जरांगे म्हणाले की " मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण देण्यासाठी सरकारनं ४० दिवसांचा वेळ मागितला होती त्यानुसार त्याची वेळ संपत आली आहे. सरकारला आता दोन दिवसात म्हणजे २४ ऑक्टोबरनंतर एक तासही देणार नाही. दिलेल्या काळानुसार निर्णय न घेतल्यास २५ ऑक्टोबरपासून अंतरवाली सराटीत पुन्हा बेमुदत उपोषण करण्यात येईल. मात्र, यावेळी उपचार सुविधा व अन्न-पाणी घेणार नसल्याचं अखेरचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात कोणत्याही राजयकीय नेत्याला येऊ दिलं जाणार नाही आरक्षण घेऊनच गावात यायचं, नाहीतर आमच्या गावची शीवही तुम्हाला शिवू देणार नाही. महाराष्ट्रभर साखळी उपोषण सुरु करण्यात येणार आहे. २८ ऑक्टोबरपासून साखळी उपोषण सुरू होणार आहे. याची जोरदार तयारी मराठा समाजाकडून केली आहे. प्रत्येक तालुक्यात आणि गावात प्रचंड संख्येनं मराठा समाजने एकत्र येऊन कँडल मार्च काढावे. हि दिशा आणि शांततेच आंदोलन सुरू केल्यानंतर हे सरकारला झेपणार नाही. २५ ऑक्टोबरला आपण पुन्हा आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. ती दिशा पुन्हा एकदा समाजाला सांगितली जाईल. हे होणार आमरण उपोषण आणि साखळी उपोषण हे महाराष्ट्रातील पाच कोटी मराठे चालवणार आहेत. हे सरकारने ध्यानात घ्यावं, असही जरांगे म्हणाले आहेत. ते तुमच्यासाठी सोपं असेल, ऐकताना हे सहज दिसत असले, तरीही ते तुम्हाला झेपणार नाही, असाही इशारा जरांगेनी यावेळी दिला आहे.