महाराष्ट्रातही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लसीकरण होणार का?
जम्मू-काश्मीरच्या आरोग्य विभागाला जमले त महाराष्ट्र सरकार करणार का?
X
कोरोनाच्या संकटाने देशाची आरोग्य व्यवस्था आणि अर्थव्यवस्था संकटात आलेली असताना यावर एकमेव उपाय म्हणजे जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण....पण संपूर्ण देशात कोरोनाच्या लसींचा तुटवडा असल्याने लसीकरणाने देशभरात हवा तसा वेग घेतलेला नाही. पण आता लसीकरणाच्या बाबतीत जम्मू-काश्मीरच्या आरोग्य विभागाने आदर्श निर्माण केला आहे. इथल्या आरोग्य विभागाचे कर्मचारी थेट शेतांमध्ये जाऊन शेतकऱ्यांचे लसीकरण करत आहेत. जम्मू आणि काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातील गावागावांमध्ये जाऊन आरोग्य कर्मचारी शेतांमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना लस देत आहेत.
महाराष्ट्रात बांधावर लस मिळणार का?
जम्मू काश्मीरच्या निमित्ताने महाराष्ट्रातही सरकार बांधावर जाऊन शेतकऱ्यांना लस देणार का, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. शहरी भागांमध्ये ड्राईव्ह इन सुविधा सुरू करण्यात आली आहे. पण ग्रामीण भागात अजूनही ज्येष्ठांसह सगळ्यांनाच लसीसाठी तासनतास रांगेत उभे रहावे लागते आहे. ज्या कृषी क्षेत्राने कोरोना संकटात देशाच्या अर्थव्यवस्थेला तारले त्याच शेतकऱ्यांना आता त्यांच्या बांधावर जाऊन लस का दिली जाऊ शकत नाही, असा प्रश्न आहे. जम्मृ-काश्मीरचा आदर्श घेत राज्य सरकारनेही आता शेतकऱ्यांना बांधावर लस देण्याची मोहीम सुरू केली पाहिजे.