Home > News Update > केंद्राची अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यांना मदत; महाराष्ट्राचा समावेश नाही

केंद्राची अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यांना मदत; महाराष्ट्राचा समावेश नाही

केंद्राची अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यांना मदत; महाराष्ट्राचा समावेश नाही

केंद्राची अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यांना मदत; महाराष्ट्राचा समावेश नाही
X

मुंबई : (मोसीन शेख) मागील वर्षी ओढवलेले नैसर्गिक संकट आणि टोळधाडीचे हल्ले यामुळे प्रचंड नुकसान झालेल्या पाच राज्यांना केंद्र सरकारने शनिवारी 3,113 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यात महाराष्ट्राला वगळण्यात आले आहे.

राष्ट्रीय आपत्ती जोखीम व्यवस्थापन कोशातून हा निधी दिला जाणार आहे. आंध्रप्रदेश, बिहार, तामिळनाडू, पुडुचेरी आणि मध्यप्रदेश या पाच राज्यांना हा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीतून समोर आलं आहे.

राज्यात जून ते ऑक्टोबर २०२० या काळात ४१ लाख हेक्टर जमीन अतिवृष्टी, पुराने बाधित झाली होती. यात मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले, घरे पडली, जमिनी वाहून गेल्या. या सर्वांना मदत करण्यासाठी १० हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, ही मदत पुरेशी नसल्याने केंद्राच्या मदतीची सुद्धा गरज होती.

त्यानंतर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने 20 डिसेंबर 2020 रोजी मराठवाड्यात दौरा सुद्धा केला होता. केंद्राकडून महाराष्ट्राला मदत मिळेल अशी अपेक्षा असताना केंद्राने मदत जाहीर केलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा समावेश नाही. त्यामुळे महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक का असा प्रश्न महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पडला आहे.

Updated : 14 Feb 2021 11:14 AM IST
Next Story
Share it
Top