आंबेडकरवाद हा कोण्या पक्षाची मक्तेदारी नाही– सुषमा अंधारे
X
सध्या महाराष्ट्रात निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत भाजप- शिवसेना या पक्षांची युती आहे. तर कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडी करुन मैदानात उतरले आहेत. या दोन्हीच्या विजयामध्य़े महत्वाची भूमिका बजावणार आहे. तो पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष.
अलिकडच्या काळात वंचित बहुजन आघाडीवर भाजपची बी टीम असल्याचा देखील आरोप झाला. यामध्ये वंचित बहुजन आघाडीवर आंबेडकर चळवळीच्या अनेक नेत्यांनी देखील या संदर्भात भाष्य केलं. त्यातच आंबेडकरी विचारांचे काही नेत्यांनी देखील हा आरोप करत वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडले.
सध्या आंबेडकर विचारसरणीच्या सुषमा अंधारे देखील आपल्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक सभांमध्ये भाषण करताना दिसतात. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंचावर जातात मात्र, त्यांना अद्यापर्यंत राष्ट्रवादीकडून कोणतंही पद घेतलेलं नाही. त्यांच्यावर आता वंचित बहुजन आघाडीचे काही नेते तोंडसुख देखील घेतात. मात्र, मोदी आणि शाह यांच्या विचारसरणीला आणि कार्य़पद्धतीला विरोध म्हणून आपण आघाडी सोबत आहोत असं उघड उघड सांगतात.
नक्की आंबेडकर चळवळ या सह आंबेडकर चळवळीचं भवितव्य़ आणि सुषमा अंधारे यांची भूमिका यावर मॅक्समहाराष्ट्राच्या प्रतिनिधी प्रियदर्शनी हिंगे यांनी सुषमा अंधारे यांची ‘टू द पॉइट’ या विशेष कार्य़क्रमात केलेली बातचित नक्की पाहा...