Home > News Update > मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एटीएसची मोठी कारवाई

मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एटीएसची मोठी कारवाई

अंटालिया स्फोटकं आणि सचिन वाझे आणि माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ उमटलं असताना स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात पहिली अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची विनायक शिंदे आणि नरेश दारे अशी नावे आहेत.

मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एटीएसची मोठी कारवाई
X

मनसुख हिरेन प्रकरणात या दोघांचाही सहभाग आढळून आला आहे. तर याच प्रकरणाशी संबंधित दोन पोलिस अधिकाऱ्यांचीही चौकशी सध्या सुरु आहे. या प्रकरणात काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

मनसुख हिरेन प्रकरणात आणखी काही नव्या बाबी उघडकीस येतील अशीही माहिती आहे. शनिवारपासूनच ठाण्यात एटीएसकडून तपासाला वेग आला होता. त्यानंतर हे प्रकरण केंद्राची यंत्रणा असलेल्या नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सीकडे गेलं आहे. आज झालेली अटक ही दहशतवाद विरोधी पथकाकडून झाली आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा छडा लावल्याचा दावा आता एटीएसकडून करण्यात येत आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात रविवारी दोघांना अटक करण्यात आली आहे. एकाचे नाव विनायक शिंदे आहे. तर दुसरी व्यक्ती नरेश दारे या नावाची आहे. मनसुख हिरेन प्रकरणात या दोघा व्यक्तींवर आरोप ठेवण्यात आला आहे. विनायक शिंदे बडतर्फ पोलिस कॉन्स्टेबल आहे. लखनभैया बोगस चकमक प्रकरणात विनायक शिंदेला पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले होते. लखनभय्या प्रकरणात विनायक शिंदेला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात तो पॅरोलवर बाहेर आला होता. तर दुसरी अटक झालेली व्यक्ती ही क्रिकेट बुकी आहे. या दोन्ही व्यक्ती ठाण्यात राहणाऱ्या आहेत.

दहशतवाद विरोधी पथक (एटीएस)कडून या दोघांनाही रविवारी अटक करण्यात आली. मनसुख हिरेन प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा आता एटीएसकडून करण्यात येत आहे. मनसुख हिरेन हत्येच्या प्रकरणात दोघांचाही सहभाग आढळल्याने दोघांनाही अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणात आणखी काही पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असून त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.

Updated : 21 March 2021 1:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top