भाजप नेत्यांचं शववाहिकेसमोर फोटो सेशन, हे पाहून तुम्हालाही लाज वाटेल
X
राजकीय नेते कशाचा इवेंट करतील सांगता येत नाही. सध्या देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. दररोज लोक मरत आहेत. मात्र, या मृत्यूतांडवात राजकारण करणार नाहीत ते राजकारणी कसले.
भोपाळमध्ये भाजप नेता अलोक शर्मा यांनी निशुल्क शववाहिका दिल्या. त्यावरही या महोदयांनी स्वत:चं नाव टाकून व्यवस्थित पोस्टर लावले आहे. एवढंच नाही तर शववाहिका थांबून त्या समोर फोटो सेशन या महोदयांनी केलं आहे. सदर महोदय भोपाळचे महापौर राहिलेले आहेत.
त्यांच्या या कृत्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.
शर्म करो बेशर्मों...?
— Narendra Saluja (@NarendraSaluja) April 19, 2021
इंदौर में ऑक्सीजन के टैंकर को घंटो रोककर भाजपा नेताओ ने ख़ूब फ़ोटो बाज़ी की और अब भोपाल में भाजपा के पूर्व महापौर आलोक शर्मा शव वाहनो के साथ फ़ोटो बाज़ी करते हुए ?
इंदौर में बन रहे कोविड केयर सेंटर पर भाजपा नेताओ का दौरा ?
आपदा में भी अवसर-फ़ोटो बाज़ी ? pic.twitter.com/xz51GCmtcF
कालच इंदोरमध्ये भाजप नेत्यांनी आलेल्या ऑक्सिजन सिलेंडर सोबत फोटो काढत वेळ वाया घालवला होता. या काळात हे ऑक्सिजन सिलेंडर लोकांपर्यंत पोहोचले असते तर लोकांचे जीव वाचले असते. मात्र, जाहिरात आणि फोटोबाजी केली नाही तर नेते कसले. नेत्यांच्या फोटोगीरीमध्ये देशात संताप व्यक्त होत आहे.